Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

July 19, 2026

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

July 19, 2026

रविवार विशेष लेख — सोनमजी, तुम्ही देशाला हवे आहात!

July 19, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आनंदी रस्त्यांवर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्यासह संगमनेरकरांनी केली धमाल; रोटरीच्या अनोख्या उपक्रमास मोठा प्रतिसाद
महाराष्ट्र संवाद विशेष

आनंदी रस्त्यांवर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्यासह संगमनेरकरांनी केली धमाल; रोटरीच्या अनोख्या उपक्रमास मोठा प्रतिसाद

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या सहभागाचा व्हिडिओ
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरFebruary 26, 2023Updated:February 26, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर
रोटरीच्या ११८ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब संगमनेरतर्फे आनंदी रस्ते या बहुप्रतिक्षीत उपक्रमाचे रविवारी (दि. २६ फेब्रुवारी) आयोजन करण्यात आले होते. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्यासह मान्यवर संगमनेरकरांचा या उपक्रमास प्रतिसाद लाभला.

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या रोटरी क्लबने धकाधकीच्या जीवनात संगमनेरकरांना काही आनंदी क्षण मिळावेत या हेतुने या उपक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांचेसमवेत संगमनेरचे नागरिक, बाळगोपाळ, रोटरी सदस्य मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. यावर्षी या उपक्रमाचे हे 7 वे वर्ष होते.

परिसराची साफसफाई, रस्त्यांवर आकर्षक चित्र, सजावट, रंगेबीरंगे फुगे, मैदानावर, रस्त्यांवर खेळला जाणारा लिंगोरचा, अप्पारप्पी, लंगडी, खो-खो, गोट्या, भोवरा, क्रिकेट, बॅडमिंटन, सापसिडी तसेच मल्लखांब, दांडपट्टा यांसारखे मर्दानी खेळ हे या उपक्रमाचे वैशिष्ट्ये होते. झुंबा डान्स हे या प्रकल्पाचे प्रमुख आकर्षण ठरले. यावर्षी १५०० चौरस फुट मापाचा राष्ट्रध्वज नागरिकांच्या सहकार्याने फडकविण्यात आला. यामुळे सर्व नागरिक काही क्षण भारावून गेले होते. ६ फूट उंचीचे रोटरी व्हील, व्हिंटेज जीप, एस २३ मोबाईल असे अनेक सेल्फी पॉईंट या ठिकाणी उभारण्यात आले होते.

शहरातील कलाकारांनी उपस्थितांचे यावेळी मनोरंजन केले. त्यामध्ये नितीन जेधे यांचे झुंबा डान्स, शुभम तवरेज यांचा ऑर्केस्ट्रा, अरविंद गाडेकर यांचे व्यंगचित्रे, प्रदीप तापडे यांची प्रश्नमंजुषा स्पर्धा असे सादरीकरण यावेळी करण्यात आले. कोविड महामारीमुळे गेली तीन वर्षे हा प्रकल्प राबविला गेला नव्हता, त्यामुळे नागरिकांमध्ये याबाबत प्रचंड उत्सुकता होती. जनतेमधून निधी गोळा करुन हा प्रकल्प राबविला जातो. यावर्षी के. के. थोरात आर.एम.सी. यांनी या प्रकल्पाचे मुख्य प्रायोजकत्व स्विकारले होते. तसेच इतरही उद्योजकांनी या प्रकल्पासाठी सढळ हाताने मदत केली होती.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष ऋषिकेश मोंढे, सेक्रेटरी आनंद हासे, प्रकल्प संस्थापक दिलीप मालपाणी, प्रकल्प प्रमुख रविंद्र पवार, अरविंद कासट, गगन थोरात, सौरभ म्हाळस तसेच प्रकल्प समितीतील अजित काकडे, योगेश गाडे, नरेंद्र चांडक, ओंकार सोमाणी, महेश वाकचौरे, भारतभुषण नावंदर, डॉ. प्रमोद राजुस्कर, डॉ. विनायक नागरे, प्रमोद मणियार, समीर शहा, मोहित मंडलिक, संजय कर्पे, अमित पवार, डॉ. विकास करंजेकर, संकेत काजळे, संदीप गुंजाळ, मनमोहन वर्मा सर्व सदस्यांची मेहनत घेतली.

रोटरी क्लब संगमनेर आयोजित ‘आनंदी रस्ते’ रोटरी डे सेलिब्रेशन या कार्यक्रमाचा आनंद घेताना डॉ. सुधीरजी तांबे व सौ. दुर्गाताई तांबे. व्हिडिओ https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid0g4TDqvQ154hW3GyDT3MPwsAqHpJjMAuUcwRTNrQF5ZSqo2AZoaiJQtC93Bxdnzbnl&id=100003786724057&mibextid=Nif5ozफेसबुक मित्र गोविंद गोसावी यांच्या सहकार्याने.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 273
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

जंतरमंतरवर हायव्होल्टेज ड्रामा: सोनम वांगचुक रुग्णालयात दाखल; अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात… रात्री काय घडलं!

July 18, 2026

भाकरीच्या भुकेने आणि जगण्याच्या वेदनेतून निर्माण झालेले नारायण सुर्वे यांचे साहित्य माणसाला जगण्याची ताकद देते : ज्येष्ठ संपादक उत्तम कांबळे

July 14, 2026

दोन फुटांवर मृत्यूचा थरार! आश्वी खुर्द येथे क्षिरसागर दाम्पत्य थोडक्यात बचावले; दोन विभागांच्या ढकलाढकलीत नागरिकांचा जीव टांगणीला

July 8, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आरोग्य

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

By अनंत पांगारकरJuly 19, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर: घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील बेफिकीर आणि ढिसाळ कारभाराचा प्रत्यक्ष अनुभव आल्यानंतर…

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

July 19, 2026

रविवार विशेष लेख — सोनमजी, तुम्ही देशाला हवे आहात!

July 19, 2026

आज, रविवार १९ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 19, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.