Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दंडकारण्य अभियानासह राज्यातील चौदा संस्था, व्यक्तींचा “सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात पर्यावरण संवर्धन” पुरस्काराने गौरव
महाराष्ट्र संवाद विशेष

दंडकारण्य अभियानासह राज्यातील चौदा संस्था, व्यक्तींचा “सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात पर्यावरण संवर्धन” पुरस्काराने गौरव

बाळासाहेब उंबरकर आणि प्रा. बाबा खरात यांचाही झाला सन्मान
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar01/03/2023Updated:01/03/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर
सजीव सृष्टीच्या रक्षणासाठी स्वातंत्र्यसेनानी, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी वयाच्या ८४ व्या वर्षी सुरु केलेल्या दंडकारण्य अभियानासह राज्यातील चौदा संस्था, व्यक्तींचा “सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात पर्यावरण संवर्धन” पुरस्काराने पुण्यामध्ये गौरव करण्यात आला आहे.

थोरात यांनी सुरू केलेले दंडकारण्य अभियान पर्यावरणाच्या दृष्टीने लोक चळवळ ठरले असून या अभियानाची दखल जागतिक स्तरावर युनोने देखील घेतली आहे. पुण्याच्या हरित मित्रपरिवार, गुरुकृपा संस्था, आकाशवाणी व दूरदर्शन केंद्र यांच्यावतीने “सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या नावाने राज्यस्तरीय पुरस्कार” दिले जात असून नुकताच हा सोहळा पुण्यामध्ये पार पडला आहे. पर्यावरण आणि संवर्धन क्षेत्रात काम करणाऱ्या विविध चौदा संस्थांना यावेळी सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

यावेळी हरित मित्र संस्थेचे अध्यक्ष डॉ. महेंद्र घागरे, प्रशांत थोरात, कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, आकाशवाणीचे गडवाल, आकाशवाणीचे उपसंचालक इंद्रजीत बागुल व अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर आदी उपस्थित होते.

दंडकारण्य अभियानासह या अभियानाचे समन्वयक बाळासाहेब उंबरकर आणि आदिवासी सेवक, प्रा. बाबा खरात यांचा देखील या पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. उंबरकर, खरात यांच्यासह बाळासाहेब आंबेडकर एस. एम. खेमनर यांनी हे पुरस्कार स्वीकारले.

पुरस्कारांबद्दल विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्री थोरात, दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख आदींसह विविध पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.

यांचा झाला सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात पर्यावरण संवर्धन पुरस्काराने गौरव…

○ सुनील बळीराम फुलारी, इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस कोल्हापूर परिक्षेत्र.
○ एम. श्रीनिवास राव, व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र बांबू मंडळ, नागपूर.
○ जय हिंद लोक चळवळ संचलित दंडकारण्य अभियान, संगमनेर.
○ बाळासाहेब दशरथ उंबरकर, कार्यक्रम समन्वयक, दंडकारण्य अभियान, संगमनेर.
○ प्रा. बाबा खरात, संगमनेर
○ प्रा. डॉ. तुकाराम शिंदे, ए. आर. बुर्ला महिला महाविद्यालय, सोलापूर.
○ प्रा. डॉ. दयानंद पांडुरंग गोगले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर.
○ मनोज बन्सीलाल टावरी, अध्यक्ष, रेनबो ग्रीनर्स, नागपूर.
○ पातोंडा परिसर विकास संस्था, पातोंडा, जळगाव.
○ अनंत रामचंद्र घरत, संपादक – पाक्षिक पर्यावरण निर्णय, पुणे.
○ गौरी नरेंद्र लागू, आकाशवाणी, पुणे.
○ अशोक विठ्ठल काळभोर, पिंपरी चिंचवड, पुणे.
○ श्रीकृष्ण मंडळ ट्रस्ट, खंडुजीबाबा चौक, डेक्कन जिमखाना, कर्वे रोड कॉर्नर, पुणे.
○ विकास मच्छिंद्र म्हस्के, प्राणी मित्र व पर्यावरण संवर्धक, लोणी, ता. राहाता, जि. अहमदनगर.
○ कार्यक्रमातील सूत्रसंचालन, निवेदन आणि वक्तृत्व यासाठी विशेष पुरस्कार निकिता ज्ञानेश्वर घुमरे, रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल, सांगवी, पो. सोमठाणे, ता. सिन्नर, जि. नाशिक.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 254
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

रविवार विशेष — पुणे–नाशिक रेल्वे : २५ दिवस संपले, आता प्रश्न फक्त कमिटीचा नाही… सरकारच्या इच्छाशक्तीचा आहे! एक संगमनेरकर म्हणून काही थेट प्रश्न…

30/08/2026

देशहितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी..; संगमनेरच्या वकिलाचे जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिसमधून थेट पत्र!

29/08/2026

नेपाळमधील महाप्रलयात संगमनेरचे ४५ पर्यटक सुखरूप; उंच ठिकाणावर असल्याने टळला मोठा अनर्थ, आज लुंबिनीतून निघून उद्या भारतात परतणार!

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

By Annant Ppangarkar03/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिलेल्या…

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.