Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

04/09/2026

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन; १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

04/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » 44 हजार मते घेऊन महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाडलं तरीही डिपॉझिट झालं जप्त! कसं ते वाचा…
महाराष्ट्र संवाद विशेष

44 हजार मते घेऊन महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाडलं तरीही डिपॉझिट झालं जप्त! कसं ते वाचा…

पराभूत नाना काटे यांचा अपवाद वगळता सर्वांनी गमावली अनामत रक्कम
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar03/03/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
पिंपरी चिंचवड पोट निवडणुकीत आघाडीचे बंडखोर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे तब्बल 44 हजार मते घेत आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या पराभवास कारणीभूत ठरले आहे या मतदारसंघातून पोटनिवडणुकीत भाजपाच्या अश्विनी जगताप निवडून आल्या असल्या तरी राहुल कलाटे यांचे डिपॉझिट जप्त झाले.

या मतदारसंघात पराभूत झालेले काटे यांनाच फक्त आपले डिपॉझिट वाचविता आले असून तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या कलाटे यांच्यासह 28 पैकी 26 जणांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यामुळे राष्ट्रवादीच्या नाना काटे यांचा विधानसभेत जाण्याचा मार्ग बंद झाल्याची चर्चा आहे.

निवडणूक आयोगाच्या नियमानुसार उमेदवारांना एकूण मतदानाच्या एक षष्ठांश मते मिळणे आवश्यक असते. मात्र काल झालेल्या मतमोजणीमध्ये राहुल कलाटे यांना 44 हजार 112 मते मिळाली आहेत. मतदारसंघांमध्ये 2 लाख 87 हजार मतदान झाले. यापैकी 47 हजार 833 मते कोणत्याही उमेदवाराला मिळणे आवश्यक होते. मात्र, कलाटे यांना 47 हजार मतांचा पल्ला गाठता आला नाही.

चिंचवडमध्ये एकूण 28 उमेदवार उभे होते. त्यापैकी भाजपच्या अश्विनी जगताप यांना सर्वाधिक 135603 मते मिळाल्याने त्या विजयी झाल्या. राष्ट्रवादीचे नाना काटे यांना 99435 मते मिळाली. तर राहुल कलाटे यांना 44112 मते मिळाली आहेत. इतर उमेदवारांना एक हजाराच्या आत मते मिळाली आहेत. काटे यांचा अपवाद वगळता कलाटे यांच्यासह या सर्वच्या सर्व 26 जणांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.

राहुल कलाटे यांचं डिपॉझिट जप्त झालं असलं तरी त्यांनी 44 हजार मते घेतल्याने नाना काटे यांना पराभूत व्हावं लागलं आहे. कलाटे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेऊन काटे यांचा प्रचार केला असता तर काटे विजयी झाले असते. मात्र, त्यांनी निवडणूक लढवल्याने महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. कलाटे अपक्ष म्हणून लढत असले तरी त्यांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला होता. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी कलाटे यांचा प्रचारही केला होता. त्यामुळे दलित समाजातील मते कलाटे यांच्याकडे वळल्याचं सांगितलं जात.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 611
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

रविवार विशेष — पुणे–नाशिक रेल्वे : २५ दिवस संपले, आता प्रश्न फक्त कमिटीचा नाही… सरकारच्या इच्छाशक्तीचा आहे! एक संगमनेरकर म्हणून काही थेट प्रश्न…

30/08/2026

देशहितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी..; संगमनेरच्या वकिलाचे जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिसमधून थेट पत्र!

29/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

By Annant Ppangarkar04/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: श्रीराम फायनान्सकडून घेतलेल्या कर्जाच्या हप्त्याचा चेक बाऊन्स झाल्याप्रकरणी समशेरपूर…

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन; १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

04/09/2026

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.