Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात आढळले १३० प्रजातीचे पक्षी
महाराष्ट्र संवाद विशेष

कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात आढळले १३० प्रजातीचे पक्षी

२३ ते २५ फेब्रुवारी दरम्यान झाले होते पक्षी सर्वेक्षण
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar06/03/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
अवघ्या महाराष्ट्राचे आकर्षण आणि पर्यटक, गिर्यारोकांचे साहस केंद्र असलेल्या अकोले तालुक्यातील कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात १३० प्रजातीचे पक्षी आढळून आले आहेत.

कळसुबाई हरिचंद्रगड अभयारण्यात पहिलेच पक्षी सर्वेक्षण २३ ते २५ फेब्रुवारी दरम्यान पार पडले. हे सर्वेक्षण कळसुबाई हरिचंद्रगड अभयारण्य, वन्यजीव विभाग नाशिक आणि आऊल कन्सर्वेशन फाउंडेशन यांच्यावतीने घेण्यात आले.

यामधे महाराष्ट्रासह बाहेर राज्यातील १६ पक्षी निरीक्षक सहभागी झाले होते. अभयारण्याच्या दोन वनपरिक्षेत्रामध्ये प्रत्येकी ४ असे अभयारण्य मिळून ८ मार्ग आखण्यात आले होते. हे मार्ग उंच-सखल जंगला नुसार कमीत कमी २ ते जास्तीत जास्त ५ किलोमीटर असे आखण्यात आले होते. सहभागी झालेल्या पक्षी निरीक्षकांनी वनरक्षक आणि वनमजूर यांच्या सहकार्याने दिलेल्या मार्गावर पक्षी सर्वेक्षण पूर्ण केले.

या पक्षी सर्वेक्षण दरम्यान एकूण १३० पक्षी प्रजातींची नोंद झाली. यामध्ये स्वर्गीय नर्तक, खंड्या, स्क्वेअर टेल बुलबुल, राखी कोंबडा, राखी बगळा, डोंबारी, बुलबुल, नीलकंठ, नदी सुरय, जंगली लावा, हिरवा पर्ण वटवट्या, निलगिरी फुलटोचा इत्यादी पक्ष्यांसह चक्रवाक, भोवत्या, भोरडी किंवा पळस मैना, कवड्या खंड्या, ओरिएंटल टर्टल होला इत्यादी प्रकारचे स्थलांतरित प्रकारचे पक्षी दिसून आले. या पक्षी सर्वेक्षण दरम्यान सर्व पक्षी निरीक्षकांनी जंगलातील वेगवेगळ्या अधिवासांमध्ये पक्षी निरीक्षण करण्याचा आनंद घेतला.

अखेरच्या दिवशी सकाळी निरीक्षण करून आल्यावर सांगता समारोह पार पाडला. यात सहाय्यक वनसंरक्षक गणेश रणदिवे, राहुल कन्सर्वेशन फाउंडेशनचे वन्यजीव बचाव पथकाचे अध्यक्ष प्रशांत शिराळ, जळगावचे मानद वन्यजीव रक्षक रवींद्र पालक, वन्यजीव छायाचित्रकार आनंद बोरा, साहित्यिक मिलिंद जोशी हे उपस्थित होते.

कार्यक्रमात आलेल्या पाहुण्यांचे स्वागत झाले तसेच वन्यजीव पक्ष निरीक्षण करताना करतानाचे अनुभव पक्षनिरीक्षकांनी व्यक्त केले. सोबतच निरीक्षण करताना आलेल्या अडीअडचणी आणि त्यावर मार्गदर्शन करण्यात आले. या निमित्ताने सहभागी पक्षनिरीक्षकांना सहभागाबद्दल प्रशिक्षित प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच अभयारण्याचा लोगो असलेले टी-शर्ट सहभागी सदस्यांना  देण्यात आले.

कार्यक्रमाच्या निमित्ताने गणेश रणदिवे  यांनी पुढेही पक्षी, फुलपाखरे, वनस्पती यांचे सर्वेक्षण ऋतूनुसार करणार असल्याचे सांगितले. या उपक्रमात वन विभागातील कर्मचाऱ्यांनी आणि सहभागी पक्षी निरीक्षकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आश्वासन दिले. झालेल्या पक्षी सर्वेक्षणाचा अहवाल लवकरच सदरील कार्यालयाला दिला जाईल असे प्रशांत शिराळ यांनी सांगितले आहे.

हे पक्षी सर्वेक्षण उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे  वन्यजीव विभाग नाशिक यांच्या परवानगीने पार पडले सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे, वनपरिक्षेत्र अधिकारी दत्ता पडवळे आणि अमोल आडे यांच्या मार्गदर्शनासह सहकार्याने आउल कन्सर्वेशन फाउंडेशन यांनी हा पक्षी सर्वेक्षण यशस्वीरित्या पार पाडला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 226
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

रविवार विशेष — पुणे–नाशिक रेल्वे : २५ दिवस संपले, आता प्रश्न फक्त कमिटीचा नाही… सरकारच्या इच्छाशक्तीचा आहे! एक संगमनेरकर म्हणून काही थेट प्रश्न…

30/08/2026

देशहितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी..; संगमनेरच्या वकिलाचे जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिसमधून थेट पत्र!

29/08/2026

नेपाळमधील महाप्रलयात संगमनेरचे ४५ पर्यटक सुखरूप; उंच ठिकाणावर असल्याने टळला मोठा अनर्थ, आज लुंबिनीतून निघून उद्या भारतात परतणार!

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

By Annant Ppangarkar03/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिलेल्या…

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.