महाराष्ट्र संवाद न्यूज
नाशिक :
आमदार बच्चू कडू यांना नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. शासकीय कामात अडथळा आणि अधिकाऱ्यासोबत गैरवर्तणूक संदर्भात न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
दिव्यांग कल्याण निधी खर्च केला नाही या वादातून आमदार बच्चू कडू यांनी महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला गेला होता. तसेच शिवीगाळ केली होती. यावर पोलिसांनी हस्तक्षेप करत पुढील घटना थांबवली आणि कडू यांना ताब्यात घेतले होते.
सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे याप्रकरणी शासकीय कामकाजात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंदविला होता. या संदर्भात नाशिकच्या न्यायालयात सुनावणी सुरू होती. न्यायालयाने शासकीय कामात अडथळा आणि अधिकाऱ्यासोबत गैरवर्तणूक संदर्भात आमदार कडू यांना दोषी ठरवत न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
न्यायालयाच्या निर्णयानंतर आमदार कडू यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान कडू यांच्याकडून जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला जाणार असून न्यायालयाच्या निर्णयाविरोधात वरिष्ठ न्यायालयात दाद मागितली जाणार असल्याची माहिती आमदार कडू यांनी दिली असल्याची माहिती मिळाली आहे.

