Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » बहुचर्चित संकेत नवले खून प्रकरणी अटकेत असलेल्या सलमान आणि शाहरुखला न्यायालयाने दिला जामीन; आरोपींविरोधातील पुरावा कमकुवत असल्याचे न्यायालयाचे निरीक्षण
न्यायालय

बहुचर्चित संकेत नवले खून प्रकरणी अटकेत असलेल्या सलमान आणि शाहरुखला न्यायालयाने दिला जामीन; आरोपींविरोधातील पुरावा कमकुवत असल्याचे न्यायालयाचे निरीक्षण

पोलीस तपास अधांतरीच; संकेतच्या मारेकऱ्यापर्यंत पोहोचण्यात पोलीस अपयशी
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/03/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर :
बहुचर्चित ठरलेल्या संगमनेरच्या अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी संकेत नवले याच्या खून प्रकरणी पोलिसांनी पकडलेल्या दोन्ही आरोपींना संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने बुधवारी जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे संशयित आरोपींच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला असून संगमनेर पोलिसांना अद्यापही संकेतच्या मारेकऱ्यांना शोधण्यात यश आलेले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

अकोले येथील रहिवासी असलेला संकेत नवले हा विद्यार्थी संगमनेरच्या अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होता. ८ डिसेंबर २०२२ रोजी त्याचा मृतदेह शहरालगतच्या सुकेवाडी रस्त्यावर असलेल्या पुनर्वसन कॉलनी जवळील एका नाल्यात आढळून आला होता. अज्ञात व्यक्तीने अज्ञात करण्यासाठी त्याचा डोक्यात धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते.

त्यामुळे संगमनेर शहर पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात शहर पोलीस ठाण्यात संकेत नवले याच्या खून प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्ह्याचा तपास संगमनेर शहर पोलीस, पोलीस उपअधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, अकोले पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांचे संयुक्त पथक करत होते. तब्बल दोन महिने जंग जंग पछाडूनही पोलिसांच्या हाती या गुन्ह्यात फारसे काही लागले नाही. पोलिसांना संकेतचे मारेकरी शोधण्यात अपयश येत असतानाच मयत संकेत नवले हा वापरत असलेल्या समलैंगिक संबंधाबाबतच्या मोबाईल ॲपच्या आधारे पोलिसांनी तपास करत सदर प्रमाणेच अन्य ॲप वापरत असलेल्या आणि शहरालगतच्या पुनर्वसन कॉलनीमध्ये राहणाऱ्या शाहरुख आणि सलमानकडे पोलिसांनी वारंवार चौकशी केली होती.

८ फेब्रुवारी २०२३ रोजी या दोघांना संगमनेर शहर पोलिसांनी संकेत नवले याच्या खून प्रकरणी अटक केली. त्यांच्याकडे तपास करत असताना पोलिसांना खुनाच्या अनुषंगाने कोणताही पुरावा आढळून आला नाही. दरम्यान आरोपींनी संगमनेरमधील वकील शरीफ पठाण यांच्यामार्फत संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. ॲड. पठाण यांनी न्यायालयासमोर पोलिसांच्या तपासा संदर्भात आणि कार्यपद्धतीबाबत विविध प्रश्न उपस्थित केले होते. तसेच आरोपी निर्दोष असण्याचा युक्तिवाद करताना चोर सोडून संन्याशाला फाशी अशा पद्धतीने पोलीस तपास असल्याचे म्हटले.

दोन्ही आरोपीं विरोधात असलेला पुरावा अत्यंत कमकुवत असल्याचे निरीक्षण नोंदवत जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश प्रशांत कुलकर्णी यांनी दोन्ही आरोपींना जामीन मंजूर केला आहे. पोलीस तपासातील त्रुटींवर बोट ठेवत तसेच खून करणारे आरोपी शोधण्यात पोलिसांना अपयश आल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्याबद्दल आरोपींच्या नातेवाईकांनी ॲड. शरीफ पठाण व ॲड. मोहसीन खान यांचे आभार मानले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 926
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

अहिल्यानगरमध्ये वकिलाच्या हत्येप्रकरणी ७ आरोपींना मरेपर्यंत जन्मठेप; जिल्हा न्यायालयाचा मोठा निकाल

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

By Annant Ppangarkar03/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिलेल्या…

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.