Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

July 19, 2026

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

July 19, 2026

रविवार विशेष लेख — सोनमजी, तुम्ही देशाला हवे आहात!

July 19, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ग. दि. माडगूळकर यांच्या नावाने सुरू करण्यात आलेला पहिलाच सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार बाबासाहेब सौदागरांना
महाराष्ट्र संवाद विशेष

ग. दि. माडगूळकर यांच्या नावाने सुरू करण्यात आलेला पहिलाच सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार बाबासाहेब सौदागरांना

11 मार्चला मुंबईत होणार पुरस्काराचे वितरण
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरMarch 9, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
श्रीरामपूर :
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा कवी श्रेष्ठ गीतकार ग दि माडगूळकर पुरस्कार श्रीरामपूर मधील कवी व चित्रपट गीतकार बाबासाहेब सौदागर यांना जाहीर झाला आहे. मुंबईमध्ये मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.

अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाच्या वतीने यंदा प्रथमच कवी श्रेष्ठ गीतकार ग दि माडगूळकर यांच्या नावाने सर्वोत्कृष्ट गीतकार पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाचे अध्यक्ष देवेंद्र मोरे यांनी या पुरस्काराची गुरुवारी मुंबईमध्ये घोषणा केली.

कवी श्रेष्ठ माडगूळकर यांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या या पहिल्याच पुरस्कारासाठी श्रीरामपूर मधील गीतकार बाबासाहेब सौदागर यांची निवड करण्यात करण्यात आल्याने श्रीरामपूरच्या कलाक्षेत्रात मानाचा तुरा रोवला गेला आहे. कवी बाबासाहेब सौदागर यांनी 80 हून अधिक चित्रपट आणि 27 मालिकांसाठी गीत लेखन केले आहे. काही लोकप्रिय चित्रपटात देखील सौदागर यांनी मुख्य भूमिका केल्या.

राजमाता जिजाऊ, मी सिंधुताई सपकाळ, घुंगराच्या नादात, सत्ताधीश, झुंजार, झुंज, एकाकी, उमंग, शिवा, तुझा दुरावा, मध्यमवर्ग, सासरची का माहेरची, चंद्रभागा, लेक लाडकी, जुगाड या चित्रपटातील त्यांची गीते लोकप्रिय झाली आहेत. याशिवाय स्वराज्य रक्षक संभाजी, स्वराज्य जननी जिजामाता, आशा अभिलाषा, चिमणी पाखरं, बंदीशाळा या मालिकांमधील त्यांची गीते लोकप्रिय ठरली. सांजगंध, पिवळण, चित्ररंग हे कवितासंग्रह, चित्रपट गीतसंग्रह प्रकाशित झाले आहे. याशिवाय भंडारभुल ही कादंबरी पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात होती.

पायपोळ हे मराठा समाजातील पहिले वास्तव चित्रण असलेले त्यांचे आत्मचरित्र देखील लोकप्रिय ठरले. घुंगराच्या नादात, सत्ताधीश, शिवा, तुझा दुरावा, गणगवळण या चित्रपटात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका केल्या. या लेखन कार्याचा गौरव म्हणून सौदागर यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष देवेंद्र मोरे आणि कार्यकारी संचालक निर्माते संजय दीक्षित यांनी म्हटले आहे.

21 हजार रुपये रोख मानपत्र मानचिन्ह गौरव वस्त्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून येत्या 11 मार्च रोजी मुंबईच्या दादर येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे गीतकार बाबासाहेब सौदागर यांना वितरण केले जाणार आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 147
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

जंतरमंतरवर हायव्होल्टेज ड्रामा: सोनम वांगचुक रुग्णालयात दाखल; अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात… रात्री काय घडलं!

July 18, 2026

भाकरीच्या भुकेने आणि जगण्याच्या वेदनेतून निर्माण झालेले नारायण सुर्वे यांचे साहित्य माणसाला जगण्याची ताकद देते : ज्येष्ठ संपादक उत्तम कांबळे

July 14, 2026

दोन फुटांवर मृत्यूचा थरार! आश्वी खुर्द येथे क्षिरसागर दाम्पत्य थोडक्यात बचावले; दोन विभागांच्या ढकलाढकलीत नागरिकांचा जीव टांगणीला

July 8, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आरोग्य

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

By अनंत पांगारकरJuly 19, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर: घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील बेफिकीर आणि ढिसाळ कारभाराचा प्रत्यक्ष अनुभव आल्यानंतर…

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

July 19, 2026

रविवार विशेष लेख — सोनमजी, तुम्ही देशाला हवे आहात!

July 19, 2026

आज, रविवार १९ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 19, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.