महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर-
श्री. दामोदर मालपाणी मेमोरियल ट्रस्ट, संस्कृत संवर्धन मंडळ, संस्कृत विभाग, संगमनेर महाविद्यालय शाळा समुह योजना, संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संस्कृत व इंग्रजी विविध गुणदर्शन स्पर्धेमध्ये मातोश्री रु. दा. मालपाणी विद्यालयाच्या प्राथमिक विभागाने भरघोस बक्षिसे मिळविली.
संस्कृत विविध गुणदर्शन स्पर्धेत प्रातःस्मरणाचे २१ श्लोक, भगवद्गीतेच्या १२ व्या, १५ व्या व १६ व्या अध्यायांचे शुद्ध उच्चारणासहीत पाठांतर करीत इ. १ली ते ४ थी च्या विद्यार्थ्यांनी तीन सांघिक व पाच वैयक्तिक बक्षिसे मिळविली. त्यात द्वितीय गटास प्रथम तर तृतीय व चतुर्थ गटास द्वितीय सांघिक पारितोषिक मिळाले.
तसेच आदिती सचिन नवले हिस प्रथम, श्लोक अमोल सुपेकर यास द्वितीय, अरुष प्रवीण राऊत यास चतुर्थ तर सक्षम ब्रिजेशकुमार यादव व आराध्य रोहिदास गुंजाळ यांना उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त झाले.
तसेच इंग्रजी कथाकथन स्पर्धेत स्वराज राहुल पाबळकर यास द्वितीय, आराध्य रोहिदास गुंजाळ यास तृतीय तर स्पंदना गणेश मोरे व पूर्वा सागर गोडसे यास उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त झाले
या सर्व विद्यार्थ्यांना शारदा शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती सुवर्णाताई मालपाणी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल शारदा संस्थेचे संचालक मंडळ, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक वर्गाकडून अभिनंदन केले जात आहे.

