Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज शुक्रवार, ०४ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

04/09/2026

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » वृषाली कडलग राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठित ‘नॅशनल वुमन्स एक्सलन्स अवॉर्ड’ पुरस्काराने दिल्लीमध्ये सन्मानित
महाराष्ट्र संवाद विशेष

वृषाली कडलग राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठित ‘नॅशनल वुमन्स एक्सलन्स अवॉर्ड’ पुरस्काराने दिल्लीमध्ये सन्मानित

शिक्षण विभागाची उंचावली मान
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/03/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर
राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठित ‘नॅशनल वुमन्स एक्सलन्स अवॉर्ड’ संगमनेर मधील धांदरफळ येथील देशमुख मळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका वृषाली कडलग यांना मिळाला. राजधानी दिल्लीत या पुरस्काराचे नुकतेच त्यांना वितरण करण्यात आले. राज्याच्या शिक्षण विभागासाठी हा पुरस्कार अभिमानास्पद ठरला आहे.

महिला दिनानिमित्त रविवारी दिल्लीच्या नवीन महाराष्ट्र सदनामध्ये आयोजित ‘मुलींवरील हिंसाचार – आव्हाने आणि मार्ग’ या राष्ट्रीय परिषदेत पुरस्काराचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमात नॅशनल वुमन्स एक्सलन्स अवॉर्ड, पंडित बिरजू महाराज नृत्यरत्न पुरस्कार, राष्ट्रीय संगीत रत्न पुरस्कार, योग रत्न पुरस्कार आणि फॅशन आयकॉन ऑफ इंडिया या पुरस्कारांचे वितरण खासदार सुनीता दुग्गल, राज्याचे माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप, माजी मंत्री सुनील भराला, परफेक्ट फाउंडेशनचे अध्यक्ष सुनीता कोडे, पद्मश्री डॉ. शोभना नारायण, सुरेखा लामतुरे, उपभोगता आयोगाचे सिद्धेश्वर कानिटकर, टीम जेनिथलचे मिथिल कळंबे, मनीषजी आदींच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

देशातील विविध क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटविणाऱ्या महिलांना यावेळी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. देशमुख मळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे उपक्रमशील शिक्षिका म्हणून परिचित असलेल्या कडलग यांचा शैक्षणिक कार्य, इनरव्हील क्लब ऑफ संगमनेरच्या प्रेसिडेंट म्हणून दिलेल्या सामाजिक योगदान आणि महिला सक्षमीकरणासाठी दिलेल्या विशेष योगदानाचा पुरस्कारासाठी विचार करण्यात आला. या कार्यकर्तृत्वाबद्दल वर्ड बुक ऑफ रेकॉर्डची मान्यता मिळविणाऱ्या कडलग या जिल्ह्यातील पहिल्या महिला शिक्षिका ठरल्या.

याशिवाय कडलग यांनी इनरव्हीलच्या प्रेसिडेंट म्हणून काम करताना कुपोषण मुक्त समाज निर्मिती, महिलांमधील कॅन्सर संदर्भात जनजागृती उपक्रम, वयात येणाऱ्या मुलींसाठी कळी उमलताना प्रकल्प, वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धन, जिल्हा परिषदेच्या संगमनेर तालुक्यातील 21 शाळांमधून आनंदी शाळा प्रकल्प, जिजाऊ ब्रिगेड या संघटनेच्या माध्यमातून मराठा समाजासाठी वधू वर सूचक मेळाव्याचे आयोजन देखील केले आहे. त्यांना यापूर्वी नाशिकच्या द पॉईंट नाऊ या संस्थेतर्फे द इन्स्पायरिंग वुमन अवॉर्ड 2022, मानव विकास राज्यस्तरीय पुरस्कार, जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षिका पुरस्कार देखील मिळाला आहे.

राष्ट्रीय दर्जा असलेल्या नॅशनल वुमन्स अवॉर्ड किताबाने सन्मानित झाल्यानंतर ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, लंडन’ यांच्या मान्यतेचे प्रमाणपत्र त्यांना मिळाले. यामुळे अहमदनगर जिल्हा शिक्षण विभागाची मान उंचावली आहे. यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 740
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

रविवार विशेष — पुणे–नाशिक रेल्वे : २५ दिवस संपले, आता प्रश्न फक्त कमिटीचा नाही… सरकारच्या इच्छाशक्तीचा आहे! एक संगमनेरकर म्हणून काही थेट प्रश्न…

30/08/2026

देशहितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी..; संगमनेरच्या वकिलाचे जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिसमधून थेट पत्र!

29/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज शुक्रवार, ०४ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar04/09/20260

आजचे राशिभविष्य: मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जादायी आणि उत्साहवर्धक राहील. प्रलंबित कामे पूर्ण…

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.