महाराष्ट्र संवाद न्यूज
आश्वी:
संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील रहिवासी व सध्या कामानिमित्त पुणे येथे वास्तव्यास असलेल्या प्रतिक राजेंद्र रातडीया याची जगप्रसिद्ध अमेरीकेतील नासा या संस्थेत संशोधक म्हणून निवड झाली आहे.
जगप्रसिद्ध अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था असलेल्या नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये (NASA) संशोधक म्हणून नुकतीचं प्रतिक रातडीया यांची निवड झाली असल्याची माहिती मिळाल्याने सुखद धक्का बसल्याची प्रतिक्रिया नातेवाईक, मित्रपरिवार व ग्रामस्थानी दिली आहे.
प्रतिक रातडीया पुढील तीन महिन्यांसाठी कृत्रिम बुद्धिमतेचा (artificial intelligence) वापर करून नासाच्या मंगळ ग्रहावर गेलेल्या यानांमध्ये विसंगती शोधण्याच्या पद्धती विकसित करण्यावर संशोधन करणार आहे. या प्रकल्पासाठी प्रतिकची अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यामध्ये नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबमध्ये विद्यार्थी संशोधक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रतिक हा राजेंद्र शांतीलाल रातडीया यांचा मुलगा तर आश्वी बुद्रुक येथिल प्रथितयश आदेश्वर उद्योग समुहाचे योगेश रसिकलाल रातडीया व निलेश रसिकलाल रातडीया सागर अशोक रातडीया यांचा भाऊ आहे. त्यामुळे आश्वीसह पंचक्रोशीतून प्रतिक रातडीया यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

