Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

04/09/2026

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन; १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

04/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राज्यात नव्या वाळू धोरणाची अंमलबजावणी सुरू होण्याच्या पूर्वसंध्येलाच संगमनेरात महसूलच्या छाप्यात जेसीबीसह मोठा वाळूसाठा पकडला
प्रशासन

राज्यात नव्या वाळू धोरणाची अंमलबजावणी सुरू होण्याच्या पूर्वसंध्येलाच संगमनेरात महसूलच्या छाप्यात जेसीबीसह मोठा वाळूसाठा पकडला

बंदी आदेश डावलून जेसीबीद्वारे वाळूतस्करी होत असताना तालुक्यातील वाळू तस्करांना नेमके आशीर्वाद कोणाचे? तस्करांच्या हप्तेखोरीत कोणा-कोणाचे खिसे गरम होताहेत!
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar01/05/2023Updated:01/05/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज)
राज्यात महाराष्ट्र दिनापासून मोठ्या थाटामाटात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नव्या वाळू धोरणाची अंमलबजावणी सुरू केली आहे. एकीकडे ही तयारी सुरू असतानाच दुसरीकडे मात्र महसूलमंत्र्यांचे खास लक्ष असलेल्या संगमनेरात मात्र नव्या धोरण लागू होण्यापूर्वीच जेसीबीद्वारे वाळू तस्करी होत असून मोठ्या प्रमाणात वाळू साठे तयार करण्यात आल्याचे महसूलच्या कारवाईत समोर आले आहे.

संगमनेरात विद्यमान महसूलमंत्र्यांनी वाळू तस्करांचे कंबरडे मोडल्याचे सांगितले जात असले तरी हा दावा महसूलनेच केलेल्या कारवाईमुळे खोटा ठरला आहे. संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथे रविवारी संध्याकाळी ही कारवाई करण्यात आली आहे. कारवाई मध्ये महसूलच्या पथकाने पाठलाग करत जेसीबी ताब्यात घेतला तसेच काही अंतरावर पथकाला मोठ्या प्रमाणात वाळू साठा देखील केल्याच्या आढळून आल्याने सोमवारी या साठ्याच्या पंचनामाचे काम सुरू होते.

खांडगाव येथील प्रवरानदी पात्रात चेतन साकुरे हा जेसीबीच्या माध्यमातून अवैधरित्या वाळूचा उपसा करत असल्याची माहिती महसूल विभागाला कळविण्यात आली होती. त्यामुळे नायब तहसीलदार उमाकांत कडनोर यांच्यासह तलाठी रामदास मुळे, बाबासाहेब नरवडे, युवराजसिंग जारवाल माहिती मिळालेल्या ठिकाणी गेले असता, महसूलच्या अधिकाऱ्यांना बघून नदीपात्रातून चालकाने जेसीबीसह पळ काढला. मात्र महसूलच्या पथकाने पाठलाग करुन हा जेसीबी पकडला. पथकाने पकडून ताब्यात घेतलेला जेसीबी संगमनेरच्या पोलीस वसाहतीत लावण्यात आला.

दरम्यान या जेसीबीच्या सहाय्याने नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा करून नदीपात्रालगतच एका ठिकाणी मोठा साठा करण्यात आला होता. सोमवारी या वाळूसाठ्याचा पंचनामा करण्याचे काम सुरू होते. दरम्यान या वाळू साठ्यातून मोठ्या प्रमाणात वाळू वाहतूक करण्यात आल्याचे पुढे येत आहे. याप्रकरणी महसूल विभागाकडून आणि राज्याच्या महसूलमंत्र्यांकडून कोणत्या प्रकारची कारवाई केली जाते, याकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान बंदी आदेश डावलून जेसीबीद्वारे वाळूतस्करी होत असताना तालुक्यातील वाळू तस्करांना नेमके आशीर्वाद कोणाचे? तस्करांच्या हप्तेखोरीत कोणा-कोणाचे खिसे गरम होताहेत! असा प्रश्न निर्माण झाला आहे. कासारवाडी, मंगळापुर, चिखली या परिसरात सुरू असलेली वाळू तस्करी देखील बरेच काही सांगून जाते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 830
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

उसनवारीवरील कर्मचाऱ्यांना १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात पाठवा; मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मुख्य सचिवांचे कडक आदेश

25/08/2026

राज्यात खळबळ..! तहसीलदार निलंबित; ‘ते’ प्रकरण भोवलं

14/08/2026

स्वातंत्र्यदिनी भंडारदरा, कळसूबाई फिरण्याचा प्लॅन आहे? आधी पोलिसांचे ‘हे’ नवीन वाहतूक नियम नक्की वाचा!

12/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

By Annant Ppangarkar04/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: श्रीराम फायनान्सकडून घेतलेल्या कर्जाच्या हप्त्याचा चेक बाऊन्स झाल्याप्रकरणी समशेरपूर…

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन; १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

04/09/2026

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.