Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरात वकिलाला मारहाण… जीवे मारण्याची धमकी… पाठोपाठ स्विफ्ट कार अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न… आणि पुन्हा मारहाण
गुन्हेगारी

संगमनेरात वकिलाला मारहाण… जीवे मारण्याची धमकी… पाठोपाठ स्विफ्ट कार अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न… आणि पुन्हा मारहाण

सलग तीन दिवसाच्या वादात गुप्तीचा धाक दाखवत सोन्याची अंगठी लांबवली; पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar03/03/2023Updated:03/05/2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज)
अंगावर स्विफ्ट कार घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करीत वकिलाला बेदम मारहाण करण्यात आली. यावेळी वकिलाला गुप्तीचा धाक दाखवत बोटातील सोन्याची अंगठी लंपास केल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी संगमनेर न्यायालयाच्या परिसरात घडला.

यासंदर्भात संगमनेर न्यायालयातील वकील ॲड. प्रसाद कडलग यांच्या तक्रारीवरून मंगळवारी रात्री संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अनिल पांडुरंग गुंजाळ, प्रवीण (पूर्ण नाव माहिती नाही) सह आणखी चार जणांवर दरोडा, मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलग तीन दिवसाच्या वादाची परिणती जिवे मारण्याचा प्रयत्न आणि मारहाणीत झाल्याने संगमनेरमध्ये खळबळ उडाली आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी, ॲड. प्रसाद कडलग हे संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात वकिली करत असून ते जवळे कडलग, ता. संगमनेर येथील रहिवासी आहे. रविवारी लोकन्यायालय असल्याने ते जवळे कडलग येथून न्यायालय मध्ये येत असताना सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास जवळे कडलग शिवारात ते आपल्या दुचाकीवरून एका ट्रॅक्टरला ओव्हरटेक करत असताना अचानक समोरून आलेल्या विना क्रमांकाच्या काळ्या रंगाच्या बोलेरो गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने बोलेरो ट्रॅक्टरला धडकली. त्यामुळे कडलग यांनी आपली दुचाकी बाजूला घेत थांबविले असता बोलेरो मधून उतरलेल्या चार-पाच जणांनी त्यांना शिवीगाळ केली तसेच अनिल गुंजाळ याने दुचाकीची चावी काढून घेत त्यांच्या कानाखाली मारून त्यांना धमकी दिली.

जमलेल्या लोकांनी कडलग यांना त्यांच्या तावडीतून सोडविले त्यावेळी आरोपींनी तू आज बचावला आहे परंतु तुला आम्ही जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली आणि दुचाकी चा नंबर नोंद करत तेथून निघून गेले. सदरचे लोक दारूच्या नशेत असल्याने कडलग यांनी ही घटना फारशी गांभीर्याने घेतली नाही.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मोबाईल क्रमांकावर अनिल गुंजाळ यांनी फोन करत शिवीगाळ केली तसेच धमकी देत फोन कट केला. सोमवारी महाराष्ट्र दिनाची सुट्टी असल्याने कडलग त्यांच्या घरी होते. मंगळवारी ते नेहमीप्रमाणे न्यायालयात आले असता न्यायालयाच्या गेट समोरून ते टायपिंगच्या दुकानात जाण्यासाठी रस्ता ओलांडत असताना समोरून भरधाव वेगाने राखाडी रंगाच्या स्विफ्ट डिझायर मधून आलेल्या कारचालक अनिल गुंजाळ याने त्यांच्या अंगावर जीवे मारण्याच्या उद्देशाने कार घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे जीव वाचविण्यासाठी कडलग गाडीपासून दूर पळाले आणि रस्त्याच्या पलीकडे जाऊन थांबले.

त्यावेळी अनिल गुंजाळ आणि त्याच्यासोबत असलेले पाच-सहा जण कडलग यांच्या अंगावर धावून आले व त्यांना शिवीगाळ करीत कडलग यांना लाथाबुक्याने मारहाण केली. आरोपीपैकी एकाने त्याच्या बेल्टला लावलेली गुप्ती दाखवत पैसे दिले नाही तर, तुझा मुडदा पाडू असा दम दिला. तुझे बाकीचे वकील लोक काय करतात ते पण बघतो असे सांगत जीव मारण्याची धमकी दिली. मारहानी दरम्यान कडलग यांच्या बोटामध्ये असलेली 17 हजार रुपये किमतीची पाच ग्रॅम वजनाचे सोन्याची अंगठी आरोपींनी काढून घेतली.

संध्याकाळी सर्व वकिलांनी एकत्र येत या संदर्भात पोलिसांना माहिती दिल्यानंतर ॲड. प्रसाद कडलग यांच्या तक्रारीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात आरोपी अनिल गुंजाळ यांच्यासह अन्य आरोपींविरोधात रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,783
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सांत्वन

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

By Annant Ppangarkar02/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जवळेकडलग येथील अकरा वर्षीय बालक कृष्णा वसंत पवार याचा…

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.