Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

दिल्लीत ‘चलो संसद’ मोर्चादरम्यान राडा: पोलिसांचा लाठीचार्ज आणि अश्रूधूर, परिसरात कलम १६३ लागू

July 20, 2026

आंदोलकांचा आवाज दाबणे ही हुकूमशाहीची नांदी; प्रकाश आंबेडकर यांची केंद्र सरकारवर तीव्र टीका

July 20, 2026

आज, सोमवार २० जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 20, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ध्रुव ग्लोबलच्या निकालाची परंपरा कायम; जिल्ह्यात वाकचौरे, कासार, शेळके व शिंदे चमकले
शिक्षण

ध्रुव ग्लोबलच्या निकालाची परंपरा कायम; जिल्ह्यात वाकचौरे, कासार, शेळके व शिंदे चमकले

वाणिज्य शाखेत संस्कृती गणोरे प्रथम
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरMay 17, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज)
केंद्रीय अभ्यासक्रमाच्या (सीबीएसई) दहावी व बारावीच्या परीक्षेत संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यानी जिल्ह्यात बाजी मारली आहे. शाळेने यंदाही आपल्या उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखतांना दहावीच्या जय नीलेश वाकचौरे व श्रेयान अनिकेत कासार यांनी प्रत्येकी 98 टक्के गुण मिळवतांना जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. तर, ध्रुवच्याच संस्कृती दत्तू शेळके (97.80 टक्के) व श्रीशा विराज शिंदे (97.40 टक्के) यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवतांना ध्रुव ग्लोबलच्या यशाची पताका फडफडती ठेवली आहे.
याशिवाय श्रीरंग गिरीश नाझीरकर, अद्वैत विवेक तळणीकर, तनया विक्रम गाडे, अनय सचिन नवले, अमनदीप नीतिन आरोटे, गायत्री विजय घुले, पृथ्वीराज प्रशांत देशमुख, जय विलास बेनके, साईतेज दादासाहेब सानप, समृद्धी महेश कर्पे, कृष्णा रमेश दिवटे, निषाध संजय विखे, यश भाऊसाहेब डामसे, जीया अमित बाफना, ओम वेणुनाथ शिंदे, ऋतुजा संतोष बेनके, साई शरद वाकचौरे, पार्थ संदीप चोथवे, मोहित मंगवानी, अद्वय अनिल जोशी, ओम रामनाथ कानवडे, तनय रवींद्र डावरे, दिव्या देविदास देशमाने व कृष्णा संतोष आरोटे या विद्यार्थ्यांनी नव्वद टक्क्यांहून अधिक गुण मिळवले.
मराठी विषयात श्रीशा शिंदे, अमनदीप आरोटे, ऋतुजा बेनके, समृद्धी कर्पे आणि यश डामसे यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले. जय वाकचौरे, अद्वैत तळणीकर, साईतेज सानप यांनी गणित विषयात शंभर गुण मिळवले. जय वाकचौरे आणि श्रीशा शिंदे यांनी समाजशास्त्र तर जीया बाफनाने आर्थिक व्यवस्थापन विषयात पूर्णच्या पूर्ण गुण प्राप्त केले.
इयत्ता बारावीच्या विज्ञान शाखेत साहिल वाळुंज (95.6 टक्के), हर्ष अभिजीत भावसार (89.2 टक्के), ईश्वरी रेवगडे (82.6 टक्के), सुहानी अनिल नरवडे (81.2 टक्के) आणि सुमित दिलीप बंडाळे (80.2 टक्के) यांनी अनुक्रमे एक ते पाच क्रमांक मिळवतांना ध्रुवच्या यशस्वी निकालाची पंरपरा उंचावत नेली.
बारावी वाणिज्य विभागातही यशाचा सिलसिला कायम राखतांना संस्कृती सचिन गणोरे (91.6 टक्के), वैष्णवी महेश गोवर्धने (88.2 टक्के), प्रिन्सेस जेबराज नादार ( 87.8 टक्के), अमनदीपसिंग पंजाबी (87.6 टक्के), भूमी खुटेटा, सिद्धी साठे आणि युगंधर भुजाडी (दोघेही 87 टक्के) यांनी अनुक्रमे पहिला ते पाचवा क्रमांक पटकावला. तर, ओम चंद्रसेन घुले याने शारीरिक शिक्षण या विषयात 100 पैकी 100 गुण मिळवले.
विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल शाळेचे चेअरमन डॉ. संजय मालपाणी, व्हा. चेअरमन गिरीश मालपाणी व प्राचार्या अर्चना घोरपडे यांनी अभिनंदन केले आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 386
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

यू डायस अहवाल: राज्यातील हजारो शाळा पायाभूत सुविधांअभावी अंधारात, डिजिटल शिक्षणाचा दावा ठरतोय फोल

July 17, 2026

मंदिरांप्रमाणेच ‘ज्ञानमंदिरांना’ दान द्या, तरच सामर्थ्यशाली देश उभा राहील: डॉ. दत्तात्रय आहेर

July 16, 2026

शिक्षकांच्या समर्पित योगदानामुळे शिंदेवाडी शाळा समृद्ध : विस्तार अधिकारी अनिल गायकवाड

June 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आंदोलन

दिल्लीत ‘चलो संसद’ मोर्चादरम्यान राडा: पोलिसांचा लाठीचार्ज आणि अश्रूधूर, परिसरात कलम १६३ लागू

By अनंत पांगारकरJuly 20, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  नवी दिल्ली: ‘नीट’ (NEET) पेपर लीक प्रकरण आणि वाढत्या बेरोजगारीच्या मुद्द्यावरून…

आंदोलकांचा आवाज दाबणे ही हुकूमशाहीची नांदी; प्रकाश आंबेडकर यांची केंद्र सरकारवर तीव्र टीका

July 20, 2026

आज, सोमवार २० जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 20, 2026

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

July 19, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.