संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज)
महाराष्ट्र राज्य नोटरी असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी संगमनेरमधील वकील जनार्दन वाळुंज यांची निवड करण्यात आली आहे. वाळुंज यांनी यापूर्वीही विविध पदांवर काम केले असून 2008 पासून महाराष्ट्र राज्य नोटरी असोसिएशनच्या माध्यमातून ते काम करत आहेत.
ठाणे येथील राज्यस्तरीय नोटरी कॉन्फरन्समध्ये निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अनंतराव जगताप यांच्या उपस्थितीत ॲड. वाळुंज यांची निवड करण्यात आली. जगताप व असोसिएशनचे अध्यक्ष श्रीनिवास तरटे यांनी वाळुंज यांची निवड जाहीर केली. वाळुंज यांच्याकडे नोटरी असोसिएशनच्या उपाध्यक्षपदाचा कार्यभार 26 मार्चपासून सोपविला गेला आहे.
उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ॲड. वाळुंज यांचे महाराष्ट्र राज्य नोटरी असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. श्रीनिवास तरटे (डोंबिवली), निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. अनंतराव जगताप (नाशिक), ॲड. मोहम्मद रयूपखान पठाण (ठाणे) ॲड. आशा गचके (मुंबई) ॲड. प्रेरणा देशपांडे (नाशिक), ॲड. अशोक वायदंडे (पुणे), ॲड. प्रकाश हेगडे (मुंबई), ॲड. श्रीनिवास गवस (सावंतवाडी) ॲड. जगदीश पटणे सातारा ॲड. अमित देशमुख (अलिबाग), ॲड. माधुरी धारिया (महाड), ॲड. बाळासाहेब थोपटे (पुणे), ॲड. गीता पाटील (मुंबई), ॲड. राजेंद्र सोनवणे (चाळीसगाव), ॲड. रवींद्र गणवीर (नागपूर), ॲड. श्वेता जोशी (अलिबाग), ॲड. नंदन भगत (मुंबई), ॲड. संजय सीतापुरे (लातूर), ॲड. केशव बगाड (नाशिक), ॲड. बी. एम. नवले (अकोले), ॲड. अनिल गोडसे (संगमनेर) यांच्यासह राज्य नोटरी असोसिएशनच्या संगमनेर, अकोले, श्रीरामपूर, राहता, कोपरगाव, राहुरी येथील सदस्यांनी अभिनंदन केले आहे.

