नवी दिल्लीः The Kerala Story चित्रपट काल्पनिक आहे. ३२ हजार मुलींनी मुस्लिम धर्म स्विकारला याची कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही, असं चित्रपटाच्या सुरुवातीलाच लिहा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी निर्मात्यांना दिले.
असे The Kerala Story चित्रपटाच्या सुरुवातीलाच सांगितले जाईल, असे निर्मात्यांच्यावतीने ज्येष्ठ वकील हरिष साळवे यांनी न्यायालयात सांगितले. त्याची नोंद घेत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड, न्या. पी. एस. नरसिम्हा व न्या. जे. बी. पारदीवाला यांच्या पूर्णपीठाने हे आदेश दिले.
सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) ने चित्रपटाला दिलेल्या प्रमाणपत्रालाही आव्हान देण्यात आले आहे. यावर न्यायालयाच्या सुट्टीनंतर सुनावणी होईल. ही सुनावणी घेण्याआधी आम्ही चित्रपट बघू, असेही न्यायालयाने नमूद केले.

