Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

05/09/2026

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » बिल्डर अविनाश भोसलेना उच्च न्यायालयाचा दिलासा नाही…
न्यायालय

बिल्डर अविनाश भोसलेना उच्च न्यायालयाचा दिलासा नाही…

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar24/05/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मुंबई (महाराष्ट्र संवाद न्यूज)

रिक्षा चालक ते अब्जाधीश असा प्रवास असलेले आणि वर्षभरापासून अटकेत असलेले पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना मुंबई उच्च न्यायालयाने तातडीने दिलासा देण्यास नकार दिला आहे. भोसले यांच्या याचिकेवरील सुनावणी ६ जूनपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

येस बँक आणि डिएचएफएल घोटळा प्रकरणात अविनाश भोसले यांना सीबीआयने २६ मे २०२२ रोजी अटक केली होती. दरम्यान, ईडीने मनी लाँड्रींगच्या आरोपात देखील तपास सुरू केला होता. तेव्हापासून अविनाश भोसले हे कोठडीत आहेत. अविनाश भोसले यांना जवळपास वर्षभरापासून जामीन मिळालेला नाही.

भोसले यांनी याप्रकरणी दिलासा मागत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या सुनावणी दरम्यान ६ जूनपर्यंत या प्रकरणाची सुनावणी तहकूब केल्याने अविनाश भोसले यांना कुठलाही दिलासा मिळालेला नाही. ईडीने येस बँक-डीएचएफएल गैरव्यवहार प्रकरणात एकूण ४१५ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. या मालमत्ता अविनाश भोसले आणि बांधकाम व्यावसायिक संजय छाब्रिया यांच्याशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे.

भोसले यांच्याशी संबंधित १६४ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर तर छाब्रिया याच्याशी संबंधीत २५१ कोटीं रुपयांच्या मालमत्तेवर ईडीने टाच आणली असून या प्रकरणात ईडीने आतापर्यंत १८२७ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे.

यश बँकेचे तत्कालीन अध्यक्ष राणा कपूर यांनी डीएचएफएलला 3 हजार ९८३ कोटी रुपये कर्ज स्वरूपात दिले होते. यातील ६०० कोटी रुपये कपूर कुटुंबियांचे नियंत्रण असलेल्या डूइट अर्बन वेन्चर इंडिया प्रा. लि. कंपनीला कर्जाच्या रुपाने देण्यात आले होते. तर वांद्रे रिक्लेमेशन प्रकल्पासाठी येस बँकेने आणखी ७५० कोटी रुपयांचे कर्ज डीएचएफएल कंपनीच्या समुहातील आरकेडब्ल्यू डेव्हलपर प्रा. लि. ला दिले. ती रक्कम कपील वाधवान व धीरज वाधवान यांनी इतरत्र वळती केली.

याप्रकरणी आरोपपत्र दाखल केल्यानंतर सीबीआयने या रकमेबाबत अधिक तपास केला असता गैरव्यवहारातील ६८ कोटी रुपये भोसले यांना सल्ला शुल्क म्हणून मिळाले. भोसले यांना 3 प्रकल्पांसाठी २०१८ मध्ये ही रक्कम मिळाली होती. त्यातील एव्हेन्यू ५४ व वन महालक्ष्मी हे दोन प्रकल्प बांधकाम व्यवसायिक संजय छाब्रिया यांनी विकसीत केले होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 483
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

04/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

By Annant Ppangarkar05/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: मानवता धर्म वाढवणाऱ्या वारकरी संप्रदायाने संपूर्ण जगाला एक नवी…

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.