Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026

संगमनेरमध्ये लोड शेडिंगविरोधात काँग्रेस आक्रमक; सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची महावितरणकडे मागणी

05/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » गायरान जागेवरील घरकुले नियमित करणार; महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
प्रशासन

गायरान जागेवरील घरकुले नियमित करणार; महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

राहाता तालुक्यातील पहिल्या शासकीय वाळू डेपोचे पुणतांबा येथे केले लोकार्पण
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/05/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

वाळू वाहतुकीकरिता खुली परवानगी देणार

मोदी आवास योजनेअंतर्गत मागील त्याला घरकुल देणार

वाळू तस्करांना पाठीशी घालणारे महसूल पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार

महाराष्ट्र संवाद न्यूज

पुणतांबे :- वाळू धोरणात सुटसुटीतपणा आणून वाळू वाहतूकीकरिता खूली परवानगी देण्यात येईल. ओबीसी समाजाच्या घरकुलासाठी मोदी आवास योजना केंद्र शासन आणत आहे‌, यात मागेल त्याला घरकुल देण्यात येईल तसेच गायरान जागेवर बांधण्यात आलेले घरकुले नियमित करण्यात येतील. अशा महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे केल्या.

राहाता तालुक्यातील पुणतांबा येथील पहिल्या शासकीय वाळू केंद्राचे उद्घाटन व लोकार्पण महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, शिर्डी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, तहसीलदार अमोर मोरे, राहाता गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, कोपरगाव गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी, पुणतांबाचे सरपंच डॉ. धनंजय धनवटे, स्थानिक पदाधिकारी नितीन दिनकर, राजेंद्र बापू जाधव, सुभाष वहाडणे पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

निळवंडेच्या पाण्यामुळे दुष्काळी भागाला सोन्याचे दिवस येणार आहेत. उजव्या कालव्याचे काम पुढील दोन महिन्यांत पूर्ण करण्यात येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पाणी सोडण्याचा कार्यक्रम प्रस्तावित आहे. अहमदनगर जिल्ह्यासाठी ही ऐतिहासिक घटना ठरणार आहे.

अहमदनगर जिल्ह्यात सध्या वाळूचे सहा डेपो सुरू आहेत‌. येत्या काळात राज्यात ६०० डेपो सुरू करण्याचे धोरण आहे. गरिबांना ६०० रूपये ब्रास एवढ्या माफक दरात वाळू देण्याचा राज्य शासनाचा‌ हा कल्याणकारी निर्णय आहे. नागरिकांनी दलालांकडून वाळू खरेदी करू नये. शासनाच्या उपक्रमास सहकार्य करावे.

महसूल, पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी‌‌ वाळू दलालांना पाठीशी घालू नये अन्यथा अशा लोकांवर कारवाई केली जाईल. अशा इशाराही मंत्री विखे पाटील यांनी दिला.

सरपंच डॉ. धनंजय धनवटे यांचेही यावेळी भाषण झाले. प्रास्ताविक अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांनी केले.

यावेळी महसूलमंत्र्यांच्या हस्ते कोपरगाव तालुक्यातील पंतप्रधान, शबरी व रमाई घरकूल योजनेतील लाभार्थ्यांना प्रत्येकी ५ ब्रास वाळू मोफत देण्यात आली. पुणतांबा येथील कृषी यांत्रिकीकरण अभियानातील लाभार्थी मनिषा धनवटे, सुमित घोडेकर, गणपत बोरभणे, शोभा धनवटे व संदीप धनवटे या लाभार्थ्यांना ट्रॅक्टर व कृषी अवजारांचे वाटप करण्यात आले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,428
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

उसनवारीवरील कर्मचाऱ्यांना १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात पाठवा; मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मुख्य सचिवांचे कडक आदेश

25/08/2026

राज्यात खळबळ..! तहसीलदार निलंबित; ‘ते’ प्रकरण भोवलं

14/08/2026

स्वातंत्र्यदिनी भंडारदरा, कळसूबाई फिरण्याचा प्लॅन आहे? आधी पोलिसांचे ‘हे’ नवीन वाहतूक नियम नक्की वाचा!

12/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

By Annant Ppangarkar05/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: संगमनेर शहराच्या सुरक्षिततेत आणि सौंदर्यीकरणात भर घालणाऱ्या विविध विकासकामांचे…

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026

संगमनेरमध्ये लोड शेडिंगविरोधात काँग्रेस आक्रमक; सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची महावितरणकडे मागणी

05/09/2026

संगमनेरात जयहिंद लोकचळवळीच्या वतीने उद्या आणि परवा बालकला महोत्सवाचे आयोजन; विविध उपक्रमांसह रंगभरण स्पर्धेची पर्वणी

05/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.