महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेरमधील प्रतिक सुखदेव इल्हे याची बुधवारी डेन्मार्क येथील Maersk या अत्यंत नामांकित कंपनीत प्लेसमेंट झाली.
प्रतिकने NRTI Badoda Gujarat (गतिषक्ती विश्व विद्यालय) या नामांकित भारत सरकारच्या शासकीय कॉलेजमधून सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये एमबीए पदवी घेतली आहे. अतिशय उच्च दर्जाच्या समजल्या जाणाऱ्या या कॉलेजमध्ये शिकणारा प्रतिक हा नगर जिल्ह्यातील पहिलाच विद्यार्थी आहे.
भारतातून फक्त शंभर मुलांची दरवर्षी या अभ्यासक्रमासाठी निवड होते. भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाअंतर्गत हे एकमेव विश्व विद्यालय आहे. अभ्यासक्रमदेखील तुलनेत खूप अवघड असतो. प्रतिकने उत्तम गुण मिळवत सदर अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.
प्रतीक उत्तम खेळाडू असून स्केटिंग प्रकारामध्ये त्याने राज्य तसेच देशपातळीवर अनेक पदके मिळविली आहेत. B.Sc.Agri नंतर गती शक्ति विश्व् विद्यालयातील प्रवेशासाठी त्याला समुपदेशक श्रीमती चित्रलेखा देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले. प्रतीक हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक सुखदेव व सुषमा यांचा मुलगा आहे. त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

