Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026

वीज मंडळाच्या कारभाराविरोधात शिवसैनिकांचा आंदोलनाचा इशारा; वीजपुरवठा सुरळीत करण्याची रवींद्र कानकाटे यांची मागणी

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » एमपीएससीमध्ये राज्यात सहाव्या आलेल्या कोपरगावच्या दर्शना पवारचा संशयास्पद मृत्यू; राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
गुन्हेगारी

एमपीएससीमध्ये राज्यात सहाव्या आलेल्या कोपरगावच्या दर्शना पवारचा संशयास्पद मृत्यू; राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

पुण्यासह अहमदनगर जिल्ह्यामध्ये खळबळ
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar19/06/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

पुणे – एमपीएससी परीक्षेमध्ये राज्यात सहाव्या आलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावच्या 26 वर्षीय दर्शना पवार हिचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. पवार हिचा मृतदेह राजगड किल्ल्याच्या पायथ्याला कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने याप्रकरणी वेल्हे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

या प्रकाराने पुण्यात खळबळ उडाली आहे. दर्शना दत्ता पवार ही मुळची अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावची आहे. गेल्या काही वर्षांपासून ती स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करत होती. पुण्यात देखील तिने क्लास लावला होता. त्यानंतर ती गावी जाऊन सेल्फ स्टडी करत होती. तसेच तिने स्पर्धा परिक्षेतून फॉरेस्ट ऑफिसर म्हणून राज्यातून तिसऱ्या क्रमांकाने यश मिळवले होते.

त्यामुळे पुण्यातील एका ॲकेडमीच्यावतीने तिचा सत्कार समारंभ होता. त्यानिमित्ताने ती 9 जूनला पुण्यात आली होती आणि नर्हे येथील एका मैत्रिणीकडे राहत होती. 12 जूनला तिने आपल्या मैत्रिणीला सिंहगड किल्ल्यावर ट्रेकींगसाठी जात असल्याचे सांगितले होते. कुटुंबाला देखील याबाबत तिने कल्पना दिली होती.

मात्र, तिथे गेल्यानंतर तिचा फोन बंद झाला आणि फोन बंद झाल्यामुळे तिच्या कुटुंबाने तीन दिवस तिचा शोध घेतला. पण ती सापडली नाही. यानंतर दर्शनाच्या कुटुंबाने सिंहगड रोड पोलिसांत मिसिंग तक्रार दाखल केली.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ शोधकार्य सुरू केले. त्यानंतर रविवारी राजगड किल्ल्याच्या पायथ्याला झाडांमध्ये दर्शनाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. तिचा मोबाईल आणि इतर वस्तू त्याठिकाणी आढळून आल्या. पोलिसांनी तिच्या नातेवाईकांशी संपर्क साधला आणि कुटुंबाने धाव घेत तिची ओळख पटवली.

या प्रकरणी दर्शनाचा मित्र राहुल हा देखील तिच्यासोबत असल्याचं सांगितलं जात असून तिचा मित्र सध्या बेपत्ता आहे. 12 जून नंतर या दोघांचेही मोबाईल बंद असल्याचे आढळून आले. दर्शनाचा मृत्यू आत्महत्या की घातपात या दृष्टीने पुणे ग्रामीण, सिंहगड रस्ता व वारजे पोलिसांकडून याप्रकरणी तपास सुरू आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,159
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

By Annant Ppangarkar02/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीवर चाप लावण्यासाठी पोलीस…

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026

वीज मंडळाच्या कारभाराविरोधात शिवसैनिकांचा आंदोलनाचा इशारा; वीजपुरवठा सुरळीत करण्याची रवींद्र कानकाटे यांची मागणी

02/09/2026

आज बुधवार, २ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.