Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये दरोडा टाकणाऱ्या संघटित टोळीवर ‘भारतीय न्याय संहिता’ कलम १११ अन्वये मोठी कारवाई; अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांचे आदेश

June 6, 2026

अपघातात निमगाव टेंभी येथील १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू

June 6, 2026

संगमनेरमध्ये वृद्ध शेतकऱ्याला भरदुपारी लुटले; पावणेदोन लाखांच्या रोकडसह धनादेश लंपास

June 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राष्ट्रीय अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा; संगमनेरची सानीया खिंवसरा राष्ट्रीय पातळीवर! देशातील बारा लाख विद्यार्थ्यांमध्ये चमकली
शिक्षण

राष्ट्रीय अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा; संगमनेरची सानीया खिंवसरा राष्ट्रीय पातळीवर! देशातील बारा लाख विद्यार्थ्यांमध्ये चमकली

अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJune 24, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – देशभरातील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी द्याव्या लागणार्‍या प्रवेश परीक्षेत संगमनेरची सानीया प्रफुल्ल खिंवसरा राष्ट्रीय पातळीवर चमकली आहे. जेईई ‘मेन’ आणि ‘एडव्हांस’ अशा दोन प्रकारात राष्ट्रीय पातळीवर घेतल्या जाणार्‍या या परीक्षेत देशभरातील बारा लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

त्यात सानियाने 1244 वे मानांकन प्राप्त करीत संगमनेरचे नाव देशाच्या पटलावर नोंदविले आहे. सानीया मालपाणी उद्योग समूहाचे कार्यकारी अधिकारी प्रफुल्ल खिंवसरा यांची कन्या आहे. लहानपणापासूनच अभ्यासात एकाग्र असलेल्या सानीयाचे प्राथमिक व माध्यमिकचे शिक्षण संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलमध्ये झाले आहे.

इयत्ता दहावीच्या शालांत परीक्षेत 99 तर इयत्ता बारावीच्या परीक्षेत 95 टक्के गुण मिळवून तिने आपल्यातील गुणवत्तेची चुणूकही दाखवली होती.

सानीयाने लहानपणापासूनच राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेतून शिक्षण घेण्याचे स्वप्नं बाळगल्याचे सांगतांना डॉ. रश्मी खिंवसरा यांचा अभिमान झळकत होता. मुलीने घेतलेल्या परिश्रमाचे गोडवे सांगत राष्ट्रीय प्रवेश परीक्षेसह (जेईई) महाराष्ट्र सामान्य प्रवेश परीक्षा (सीईटी) मध्येही तिने अनुक्रमे 99.75 अणि 99.96 पर्सेंटाईल गुण मिळविले. राष्ट्रीय ऑलिम्पियाड (रसायन शास्त्र) मध्ये देखील देशभरातील अवघ्या एक टक्का विद्यार्थ्यांमधून सानीयाची निवड झाल्याचे डॉ. खिंवसरा यांनी सांगितले.

जेईई ऍडवान्सड परीक्षेत अभूतपूर्व यश मिळविल्याने तिला आता राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या (आयआयटी) मुंबई, चेन्नई, दिल्ली, कानपूर, खरगपूर, रूडकी या देशातील सर्वाधिक प्रतिष्ठीत व आंतरराष्ट्रीयस्तरावर नामांकित असलेल्या संस्थांमध्ये प्रवेश मिळू शकतो. तिने संगणक शास्त्र अथवा इलेक्ट्रीकल/इलेक्ट्रोनिक्स या विषयात अभियांत्रिकीचे उच्च शिक्षण घेण्याचे ठरवले आहे.

सानीयाने मिळवलेले हे यश संगमनेरचे नाव देशाच्या पातळीवर नेणारे आहे. या देदीप्यमान यशाबद्दल मालपाणी उद्योग समूहाचे चेअरमन राजेश मालपाणी यांच्यासह संचालक डॉ. संजय, मनीष, गिरीश, आशिष मालपाणी यांनी सानीयाचे अभिनंदन केले आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,318
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

मराठी शाळा बंद करण्याचा सरकारचा घाट; डॉ. सुधीर तांबे यांचा घणाघात

April 18, 2026

अहिल्यानगर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेमुळे शाळांच्या वेळेत बदल; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

April 17, 2026

संगमनेरच्या नगरपालिका शाळांचा कायापालट होणार; नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे ॲक्शन मोडमध्ये!

January 21, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेरमध्ये दरोडा टाकणाऱ्या संघटित टोळीवर ‘भारतीय न्याय संहिता’ कलम १११ अन्वये मोठी कारवाई; अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांचे आदेश

By अनंत पांगारकरJune 6, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर: संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाशिक-पुणे हायवेवर शस्त्रांचा धाक…

अपघातात निमगाव टेंभी येथील १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू

June 6, 2026

संगमनेरमध्ये वृद्ध शेतकऱ्याला भरदुपारी लुटले; पावणेदोन लाखांच्या रोकडसह धनादेश लंपास

June 6, 2026

वीज चोरी पकडणाऱ्या कंत्राटी वायरमनने मागितली ५० हजारांची लाच! गुन्हा दाखल, वायरमन अटकेत; सोमवारपर्यंत पोलीस कोठडी

June 6, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.