Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026

संगमनेरमध्ये लोड शेडिंगविरोधात काँग्रेस आक्रमक; सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची महावितरणकडे मागणी

05/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ज्येष्ठ तमाशा कलावंत शांताबाई लोंढे यांची जिल्हाधिकारी, समाज कल्याण आयुक्तांनी घेतली भेट; शासकिय योजनांचा लाभ देणार
प्रशासन

ज्येष्ठ तमाशा कलावंत शांताबाई लोंढे यांची जिल्हाधिकारी, समाज कल्याण आयुक्तांनी घेतली भेट; शासकिय योजनांचा लाभ देणार

मुख्यमंत्री, पालकमंत्री, सांस्कृतिक मंत्र्यांकडून प्रशासनाला मदतीच्या सूचना
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/06/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

शिर्डी – जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी ज्येष्ठ तमाशा कलावंत शांताबाई अर्जून लोंढे-कोपरगावकर यांची आज द्वारकामाई वृध्दाश्रम येथे भेट घेत ‍विचारपूस केली. वृध्द कलावंत म्हणून शांताबाईंचा शासनाच्यावतीने योग्य तो सन्मान राखत शासकीय योजनांचा लाभ त्यांना मंजूर केला जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी ही भेट घेतली. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही शांताबाईंच्या प्रकृतीची समाज कल्याण सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करून विचारपूस केली. त्यांना सर्वतोपरी शासकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही मुनगंटीवार यांनी यावेळी दिल्या.

मागील दोन ‍दिवसापासून शांताबाईंची वृध्दापकाळात परवड सुरू असल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या. माजी आमदार स्नेहलता कोल्हे, द्वारकामाई ट्रस्टचे सल्लागार सचिन तांबे व डॉ.अशोक गावित्रे यांनी त्यांना २४ जून रोजी द्वारकामाई वृध्दाश्रमात दाखल केले होते. त्या द्वारकामाई वृद्धाश्रम येथेच निवास करणार आहेत. त्यांची प्रकृती व्यवस्थित असून त्यांच्यावर पुढील वैद्यकीय उपचार केले जाणार आहेत.

शांताबाई लोंढे-कोपरगांवकर यांना महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कला संचलनालय, मुंबई यांची वृद्ध कलावंत मानधन योजना सन- २००९ पासून त्यांना वर्ग ‘क’ कलाकार म्हणून दर महिन्याला २२५० रुपये मानधन मिळत आहे. मे २०२३ चे मानधन त्यांच्या स्टेट बॅक इंडियाच्या बॅंक खात्यावर ८ जून २०२३ रोजी जमा झाले आहे, असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी राधाकिसन देवढे यांनी सांगितले.

लोंढे यांना कोपरगावच्या तहसीलदारांनी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मंजूर केला आहे‌. त्यानूसार त्यांना एक हजार रूपये दरमहा मानधन मिळणार आहे. दुबार रेशनकार्ड जिवित व ऑनलाईन करून शासनाच्या नियमाप्रमाणे अंत्योदय योजनेचा लाभ, तसेच केंद्र पुरुस्कृत कलाकार मानधन योजनांचा लाभ देण्याची कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल. घरकुल योजनेचा लाभ देण्याबाबत कोपरगाव नगरपालिका मुख्याधिकारी यांना सूचना देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी सालीमठ यांनी सांगितले. प्रशासनाने त्यांच्या प्रकृतीची आस्थवाईकपणे केलेल्या चौकशीमुळे त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत समाज कल्याण सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे, शिर्डी प्रांताधिकारी माणिक आहेर, कोपरगावचे तहसीलदार संदीपकुमार भोसले, राहाताचे तहसीलदार अमोल मोरे, कोपरगावचे गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी, कोपरगावचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी, विस्तार अधिकारी बी. बी. वाघमोडे, समाजकल्याण निरीक्षक विनोद लाड, द्वारकामाई वृध्दाश्रमचे व्यवस्थापक बी. श्रीनिवास, सल्लागार सचिन तांबे आदी उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 682
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

उसनवारीवरील कर्मचाऱ्यांना १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात पाठवा; मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मुख्य सचिवांचे कडक आदेश

25/08/2026

राज्यात खळबळ..! तहसीलदार निलंबित; ‘ते’ प्रकरण भोवलं

14/08/2026

स्वातंत्र्यदिनी भंडारदरा, कळसूबाई फिरण्याचा प्लॅन आहे? आधी पोलिसांचे ‘हे’ नवीन वाहतूक नियम नक्की वाचा!

12/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

By Annant Ppangarkar05/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: संगमनेर शहराच्या सुरक्षिततेत आणि सौंदर्यीकरणात भर घालणाऱ्या विविध विकासकामांचे…

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026

संगमनेरमध्ये लोड शेडिंगविरोधात काँग्रेस आक्रमक; सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची महावितरणकडे मागणी

05/09/2026

संगमनेरात जयहिंद लोकचळवळीच्या वतीने उद्या आणि परवा बालकला महोत्सवाचे आयोजन; विविध उपक्रमांसह रंगभरण स्पर्धेची पर्वणी

05/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.