महाराष्ट्र संवाद न्यूज
अहमदनगर – दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार दि. 3 जुलै, 2023 रोजी दुपारी १-०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पंडित जवाहरलाल नेहरु सभागृहात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.
सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. 

