Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील लाठीमाराच्या विरोधक आक्रमक: राहुल गांधींनी मागितला पंतप्रधान मोदी, अमित शहा अन् धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

July 21, 2026

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मध्यस्थीने संगमनेरात शेतकऱ्यांचा दीड तासांचा महामार्ग रोको मागे शासकीय बफर स्टॉकमधून युरिया मिळताच आंदोलन स्थगनावर शिक्कामोर्तब; लिंकिंग आणि ढिसाळ नियोजनावरून महायुती सरकारवर कडाडून टीका

July 21, 2026

संगमनेरमधील ‘मेडीकव्हर’चा काळा धंदा चव्हाट्यावर! महात्मा फुले योजनेच्या नावाखाली लाच मागणारे ‘रॅकेट’ लाचलुचपतच्या जाळ्यात, दोघांवर गुन्हा दाखल!

July 21, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरच्या या सुपुत्रासह नगर जिल्ह्यातील चौघांची भारतीय प्रशासकीय सेवेत निवड; लवकरच मिळणार जिल्हाधिकारीपदाची संधी
प्रशासन

संगमनेरच्या या सुपुत्रासह नगर जिल्ह्यातील चौघांची भारतीय प्रशासकीय सेवेत निवड; लवकरच मिळणार जिल्हाधिकारीपदाची संधी

प्रशासकीय सेवेत जिल्ह्याची मान उंचावली
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJune 29, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या चौघांचे सेवा जेष्ठतेनुसार भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये निवड करण्यात आली आहे. यामध्ये संगमनेरच्या विकास पानसरे यांच्यासह गोरक्ष गाडीलकर गुलाबराव खरात व सतीश खडके यांचा समावेश आहे.

या चौघा अधिकाऱ्यांना लवकरच प्रशासकीय सेवेतील सर्वोच्च पद असलेले जिल्हाधिकारी पद भुषविण्याचा मान मिळणार आहे. विशेष म्हणजे निवड झालेले चौघेही आयएएस अधिकारी कृषी पदवीधर असतील. जिल्ह्यातील चौघांना एकाच वेळी हा सन्मान मिळाल्याने अहमदनगर जिल्ह्याची मान प्रशासकीय सेवेत उंचावली आहे.

सध्या अहमदनगर जिल्हा जात पडताळणी समितीचे अध्यक्ष असलेले विकास पानसरे संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील रहिवासी असून त्यांनी बारा वर्षांपूर्वी अहमदनगर येथे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे.

सध्या नागपूर व धुळे येथील जात पडताळणी समितीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले गोरक्ष गाडीलकर हे पारनेर तालुक्यातील असून 1996 मध्ये उपजिल्हाधिकारी पदी रुजू झाले होते. त्यांनी देखील अहमदनगरमध्ये काही काळ जिल्हा पुनर्वसन अधिकारी, रोजगार हमी योजना उपजिल्हाधिकारी, जळगाव येथे अपर जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. याशिवाय बुलढाणा येथे निवासी उपजिल्हाधिकारी अमरावती येथे भूसंपादन अधिकारी तर मोर्शी येथे प्रांताधिकारी म्हणून काम बघितले आहे.

नेवासे तालुक्यातील भेंडा येथील रहिवासी असलेले गुलाबराव खरात हे गत 25 वर्षांपासून महसूल विभागात कार्यरत आहे. त्यांनी देखील अमरावती, बुलढाणा, जळगाव आणि धुळे येथे जिल्हा जात पडताळणी समितीचे अध्यक्ष म्हणून काम बघितले. अहमदनगर येथे जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्हा पुनर्वसन अधिकारी या पदावर काम केले आहे. पदोन्नतीनंतर त्यांनी नंदुरबार, जळगाव येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून काम बघितले आहे. काही काळ ते पुणे येथे शेती महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते.

याचबरोबर सतीश खडके हेदेखील अहमदनगर जिल्ह्यातील चिचोंडी पाटील येथील रहिवासी आहे. 1995 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेत राज्यात प्रथम आलेले खडके सध्या सिडकोचे अपर जिल्हाधिकारी म्हणून सध्या काम पाहत आहे. त्यांनी सुरुवातीला विक्रीकर अधिकारी नंतर जळगावचे प्रांताधिकारी म्हणून काम बघितले असून नाशिक महापालिकेत देखील त्यांनी काम केले आहे. याशिवाय पिंपरी-चिंचवड प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही त्यांनी कामकाज सांभाळले.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,780
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

पोलीस दलातील बहुचर्चित अंमलदार चौधरी यांचे निलंबन, एसपींचा मोठा निर्णय

July 15, 2026

या कारणासाठी संगमनेरच्या ‘हॉटेल रंगीला पंजाब’चा परवाना ३० दिवसांसाठी निलंबित; जिल्हाधिकाऱ्यांची कडक कारवाई

July 4, 2026

गुटखा माफियांना थेट ‘मकोका’! आयएएस तुकाराम मुंढेंचा ऐतिहासिक सर्जिकल स्ट्राईक

June 12, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील लाठीमाराच्या विरोधक आक्रमक: राहुल गांधींनी मागितला पंतप्रधान मोदी, अमित शहा अन् धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

By अनंत पांगारकरJuly 21, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन नवी दिल्ली:  जंतर मंतर मैदानावर सीजेपी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराच्या घटनेनंतर…

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मध्यस्थीने संगमनेरात शेतकऱ्यांचा दीड तासांचा महामार्ग रोको मागे शासकीय बफर स्टॉकमधून युरिया मिळताच आंदोलन स्थगनावर शिक्कामोर्तब; लिंकिंग आणि ढिसाळ नियोजनावरून महायुती सरकारवर कडाडून टीका

July 21, 2026

संगमनेरमधील ‘मेडीकव्हर’चा काळा धंदा चव्हाट्यावर! महात्मा फुले योजनेच्या नावाखाली लाच मागणारे ‘रॅकेट’ लाचलुचपतच्या जाळ्यात, दोघांवर गुन्हा दाखल!

July 21, 2026

केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी; संगमनेरमध्ये प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

July 21, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.