Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

05/09/2026

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमधील ‘त्या’ डॉक्टरला न्यायालयाकडून दिलासा; अटकपूर्व जामीन मंजूर
न्यायालय

संगमनेरमधील ‘त्या’ डॉक्टरला न्यायालयाकडून दिलासा; अटकपूर्व जामीन मंजूर

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar06/07/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये तपासात पोलिसांना सहकार्य करण्याच्या व हर्बल औषधांसह कोणत्याही प्रकारचे औषध रुग्णांना न देण्याच्या अटीवर संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने ‘त्या’ डॉक्टरला तब्बल महिनाभरानंतर अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

बोगस डॉक्टर शोध समितीच्या सचिव डॉक्टर प्रतिभा कचकुरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात जावेद आयुब शेख यांच्या विरोधात महाराष्ट्र वैद्यक व्यावसायिक अधिनियम 1961 च्या कलम 33 व 37 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर डॉ. शेख यांनी संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात ॲड. शरीफ पठाण व ॲड. मोहसीन शेख यांच्या माध्यमातून अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. न्यायाधीश प्रशांत कुलकर्णी यांच्यासमोर या जामीन अर्जावर सुनावणी झाली. न्यायाधीश कुलकर्णी यांनी अटी शर्तींवर आरोपी डॉ. शेख यांना जामीन मंजूर केला आहे.

काय होती तक्रार…

कॉटेज हॉस्पिटलच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकारी तथा बोगस डॉक्टर शोध समितीच्या सचिव प्रतिभा कचकुरे यांना संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा बोगस डॉक्टर शोध समितीचे अध्यक्ष राहुल वाघ यांनी डॉ. जावेद आयुब शेख यांच्या नवरंग कॉम्प्लेक्स, बागवानपुरा येथील क्लिनिकची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. तपासणीमध्ये कचकुरे यांना तपासणी दरम्यान डॉक्टर शेख यांच्याकडे वैद्यकीय व्यवसायाची कोणतेही डिग्री आढळून आली नाही तसेच ते रुग्णांवर उपचारासाठी नैसर्गिक जडीबुटीचा वापर करत असल्याबाबत त्यांनी माहिती दिली होती.

शेख यांनी पथकातील अधिकाऱ्यांना वैद्यकीय व्यवसायातील नोंदणी प्रमाणपत्र दाखविले नाही सादर केले नाही तसेच त्यांच्याकडे कौन्सिल ऑफ नॅचरोपॅथीचे रजिस्ट्रेशन आढळून आले नाही.

डॉ. शेख यांच्याकडे आढळलेली कागदपत्रे, कोणतेही नाव नसलेले गोळ्यांची डबी, चुरणाचे डबे वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी पुरेशी नसल्याने त्यांना बोगस डॉक्टर ठरवून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,735
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

04/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

By Annant Ppangarkar05/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: मानवता धर्म वाढवणाऱ्या वारकरी संप्रदायाने संपूर्ण जगाला एक नवी…

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.