Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » रिक्षात बसलेल्या सहप्रवासी महिलेने लांबविले पंच्याहत्तर हजार रुपये, संगमनेरमधील घटना
गुन्हेगारी

रिक्षात बसलेल्या सहप्रवासी महिलेने लांबविले पंच्याहत्तर हजार रुपये, संगमनेरमधील घटना

संगमनेरातील चोऱ्या थांबविण्यात पोलीस प्रशासन अपयशी
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar22/07/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – रिक्षातून प्रवास करणाऱ्या महिलेकडील पंच्याहत्तर हजार रुपयांचे रोकड दुसऱ्या सहप्रवासी महिलेने लांबविल्याचा प्रकार समोर आला आहे. या संदर्भात शहर पोलीस ठाण्यात अज्ञात महिला चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुक्रवारी अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज येथून ब्युटी पार्लर व्यावसायिक महिला उज्वला सातपुते या रिक्षाने जवळ असलेली पंच्याहत्तर हजार रुपयाची रोख रक्कम घेऊन मैत्रिणीच्या बँक खात्यात एचडीएफसी बँकेत भरण्यासाठी संगमनेरकडे येत असताना ही घटना घडली.

सकाळी 11 वाजता त्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गेटवरून प्रवासी रिक्षात बसून संगमनेरकडे येत होत्या. यावेळी रिक्षात त्या एकट्याच होत्या. दरम्यान रिक्षा घुलेवाडी जवळील म्हसोबा मंदिराजवळ आल्यानंतर दोन महिलांनी रिक्षाला हात केल्याने रिक्षा थांबली. त्यानंतर या दोन महिला रिक्षात बसल्या.

पुढे काही अंतरावर नावंदर टायर दुकानाजवळ आणखी दोन महिलांनी रिक्षा थांबविली. दोघींपैकी एक महिला सातपुते यांच्या शेजारी तर दुसरी महिला रिक्षाचालका शेजारी बसली होती. सातपुते यांच्यासह रिक्षातील पाच महिलांपैकी चार महिला मागच्या सीटवर दाटीवाटीने तर एक महिला पुढच्या सीटवर बसलेली होती. सह्याद्री कॉलेज जवळ रिक्षातील नंतर बसलेल्या दोन महिलांनी रिक्षा थांबविण्यास सांगितले व त्या रिक्षातून खाली उतरल्या.

त्यानंतर पुढे जय जवान चौकाजवळ रिक्षातील उरलेल्या दोन महिलांनी रिक्षा थांबून त्या रिक्षातून खाली उतरल्या. तर सातपुते रिक्षातून हॉटेल काश्मीर जवळ उतरण्यासाठी थांबल्या. यावेळी त्यांनी रिक्षा चालकाला पैसे देण्यासाठी स्वतः जवळील पर्स बघितली असता त्यांना पर्सची चैन उघडी दिसली. त्यावेळी त्यांना पर्समधून पंच्याहत्तर हजार रुपये अज्ञात महिलेने लांबविल्याचे लक्षात आले.

त्यांनी या संदर्भात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात महिलेविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान रिक्षातून सहप्रवासी महिलेने रोख रक्कम लांबविल्याने शहरात चोरट्यांनी दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे. ही दहशत मोडून काढण्याचे आव्हान संगमनेर पोलिसांसमोर आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,320
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar03/09/20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी नवीन…

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.