महाराष्ट्र संवाद न्यूज
नवी दिल्ली – कोळसा घोटाळा प्रकरणात दिल्लीच्या न्यायालयाने काँग्रेसचे माजी खासदार विजय दर्डा आणि त्यांचा मुलगा देवेंद्र, आणखी एक दोषी मनोज कुमार जयस्वाल यांना चार वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली असल्याची बातमी समोर येत आहे.
13 जुलैला दिल्लीतल्या विशेष न्यायालयाने त्यांना या प्रकरणात दोषी ठरवलं होतं. यासंदर्भात न्यायालयाने काही वेळांपूर्वीच या संबंधातील शिक्षेचा निर्णय दिला आहे.
राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा, मुलगा देवेंद्र दर्डा, कोळसा विभागाचे माजी सचिव एच. सी. गुप्ता, के. एस. क्रोफा, के. सी. सामरीया, मनोजकुमार जयस्वाल इत्यादींचा या प्रकरणात आरोपींमध्ये समावेश होता.
यात दर्डा पिता-पुत्रासह जेएलडी यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक मनोज कुमार जयस्वाल या तिघा जणांना चार वर्षाची तर निवृत्त कोळसा सचिव एच. सी. गुप्ता दोन ज्येष्ठ अधिकारी के. एस. कोफ्रा आणि के. सी. सामरीया यांना तीन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

