Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पुन्हा एकदा गोल्ड व्हॅल्यूअरने बँकेला घातला 22 लाखाला गंडा; आरोपींमध्ये चार बँकांना गंडविणाऱ्या ‘शहाणे’सह यांचा आहे समावेश…
गुन्हेगारी

पुन्हा एकदा गोल्ड व्हॅल्यूअरने बँकेला घातला 22 लाखाला गंडा; आरोपींमध्ये चार बँकांना गंडविणाऱ्या ‘शहाणे’सह यांचा आहे समावेश…

बँकेच्या फसवणुकीचा आणखी एक प्रकार समोर
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar31/07/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

इंडियन ओव्हरसीज बँकेचा गोल्ड व्हॅल्यूअर जगदीश म्हसेने ‘शहाणे’सह दहा खातेदारांच्या नावे केली बोगस सोनेतारण प्रकरणे, मिलीभगत आली समोर

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – आधीच चार बँकांना गंडविणाऱ्या गोल्ड व्हॅल्यूअर जगदीश शहाणेसह इंडियन ओव्हरसीज बँकेचा गोल्ड व्हॅल्यूअर जगदीश म्हसेचा नवा फ्रॉड समोर आला आहे. आरोपींमध्ये म्हसे, शहाणे या दोघा सोनारांसह पाच जणांचा समावेश आहे. बँकेचे शाखाधिकारी निवृत्ती काळू नव्हाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात 27 जुलैला आरोपींविरोधात भारतीय दंड संहिता कलम 120 B, 34, 420, 465, 467, 474 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींमध्ये यांचा आहे समावेश: जगदीश सुभाष म्हसे (रा. घुलेवाडी, संगमनेर), उत्तम विश्वनाथ पानसरे (रा. वाघापूर, संगमनेर), लहानु किसन नेहे (रा. नांदुरी दुमाला, संगमनेर), मंगेश संपत दिघे (रा. कोल्हेवाडी, संगमनेर) व जगदीश लक्ष्मण शहाणे (रा. घुलेवाडी, संगमनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

असा उघड झाला प्रकार: कर्जदारांनी बँकेत ठेवलेल्या सोन्याची वैधता व शुद्धता तपासणी करिता बँकेने जगदीश सुभाष म्हसे याची मूल्यांकनकार म्हणून नेमणूक केली होती. बँकेच्या नियमित सहामाही सोनेतारण पर्यवेक्षण अहवाल तपासणीकरिता बँकेने चंद्रकांत डहाळे व बँक इन्स्पेक्टर नवनीत कटियान (वरिष्ठ प्रबंधक इंडियन ओव्हरसीज बँक नाशिक रोड) यांना पाठविले असता त्यांनी बँकेत तारण ठेवण्यात आलेल्या सोन्याची तपासणी केली असता दहा सोनेतारण पिशव्यांमधील सोने बनावट व अनधिकृत असल्याचे आढळून आले.

यांच्या नावावर संगनमताने गोल्ड व्हॅल्यूअर म्हसेने केला घोटाळा: सोने बनावट व अनधिकृत असल्याचे आढळून आल्यानंतर बँकेने गोल्ड व्हॅल्यूअर म्हसे याला विचारणा करण्यासाठी बँकेत बोलावले असता त्याने लेखी हमीपत्राद्वारे सोने धारण कर्जदार उत्तम विश्वनाथ पानसरे, लहानु किसन नेहे, मंगेश संपत दिघे व जगदीश लक्ष्मण शहाणे यांच्या नावाने बँकेत ठेवलेल्या दहा कर्ज प्रकरणातील बनावट सोने प्रकरणातील कर्जाची रक्कम स्वतःच्या आर्थिक अडचणींची पूर्तता करण्यासाठी वापरली असल्याचे व त्या रकमेची भरपाई देण्याची जबाबदारी स्वतःची असल्याचे बँकेस लिहून दिले. त्यानंतर लहानु किसन नेहे, मंगेश संपत दिघे यांनी जगदीश म्हसेच्या मदतीने त्यांचे कर्ज खाते पूर्णतः तसेच उत्तम विश्वनाथ पानसरे यांनी त्याच्या कर्ज खात्यापैकी एका खात्यावरील संपूर्ण रक्कम भरणा केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

असे फसवणुकीचे आकडे आहेत: शाखाधिकारी नव्हाटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार उत्तम विश्वनाथ पानसरे यांनी चार पैकी एक सोनेतारण प्रकरण नील केले असून उर्वरित तीन सोनेतारण प्रकरणातील अनुक्रमे 2,56,214, 3,20,447 व 1,02,500 असे एकूण 6,79,161 रुपयांची थकबाकी, तर जगदीश लक्ष्मण शहाणे यांच्या चार कर्ज प्रकरणातील अनुक्रमे 3,08,165, 3,87,105, 3,56,234 व 4,61,012 असे एकूण 15,12,516 थकबाकी असून त्यांनी 21,91,677 रुपयांची व उत्तम विश्वनाथ पानसरे, लहानु किसन नेहे, मंगेश संपत दिघे यांनी बनावट सोने तारण ठेवून फसवणूक केल्याचे म्हटले आहे. या सर्वांविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,421
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सांत्वन

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

By Annant Ppangarkar02/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जवळेकडलग येथील अकरा वर्षीय बालक कृष्णा वसंत पवार याचा…

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.