Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

बुधवार, २१ ऑक्टोंबर —- आजच्या दिवसाचे राशिभविष्य

21/10/2026

“सर्व अडचणी दूर होऊन जनतेच्या जीवनात सुख-समाधान नांदो!”; नवरात्रोत्सवात माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांची भावूक प्रार्थना

20/10/2026

संगमनेरात विजयादशमीला आरएसएसचे पथसंचलन! स्वयंसेवकांच्या रुपात आमदार अमोल खताळ पाटलांची एन्ट्री

20/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी संगमनेरातून दोन महिन्यात 48 व्यक्तींच्या तडीपारीचे प्रस्ताव ‘एसपी’कडे; सर्वाधिक प्रस्ताव संगमनेर शहर पोलिसांकडून
गुन्हेगारी

कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी संगमनेरातून दोन महिन्यात 48 व्यक्तींच्या तडीपारीचे प्रस्ताव ‘एसपी’कडे; सर्वाधिक प्रस्ताव संगमनेर शहर पोलिसांकडून

वाढत्या गुन्हेगारीला प्रतिबंध घालण्यासाठी उपाययोजना
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar31/07/2023Updated:31/07/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – वाढत्या गुन्हेगारीला पायबंध घालण्यासाठी संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाने कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. जून-जुलै या दोन महिन्यांच्या कालावधीत पोलीस उपाधीक्षकांच्या कार्यालयामार्फत जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे (superintendent of police) तब्बल 48 गुन्हेगारी व्यक्तींच्या तडीपारीचे प्रस्ताव पाठविण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.

का केली कारवाई: प्रस्तावित प्रस्तावानुसार आगामी काळामध्ये येणारे सण उत्सव शांततेमध्ये पार पडावे. त्याचप्रमाणे संगमनेर पोलीस उपविभागातील सर्वसामान्य नागरिकांच्या, सुरक्षेच्या दृष्टीने संगमनेर पोलीस उपविभागाकडून कायदा सुव्यवस्था राखली जावी यासाठी रेकॉर्डवरील या सर्व गुन्हेगारांविरोधात विविध कारवाया करण्यात येत आहेत. त्यापैकी ही एक मोठी कारवाई मानली जात आहे.

प्रत्येकाच्या नावावर पाच पेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद: संगमनेर उपविभागाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी गुन्हेगारीचा बिमोड करण्याच्या दृष्टीने उपविभागातील संगमनेर शहर पोलीस स्टेशन, संगमनेर तालुका पोलीस स्टेशन, आश्वी पोलीस स्टेशन, घारगाव पोलीस स्टेशन, अकोले पोलीस स्टेशन व राजुर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वारंवार गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांची संपूर्ण माहिती संबंधित पोलीस स्टेशनच्या माध्यमातून संकलित करण्यात आलेली आहे. पूर्वीचे गुन्हेगारी रेकॉर्ड असणाऱ्या ज्या गुन्हेगारांनी सन 2022 व 2023 मध्ये पुन्हा गुन्हे केलेले आहेत अशा सर्व गुन्हेगारांची माहिती अद्यावत केली आहे.

यातील प्रत्येक व्यक्तीविरुद्ध किमान पाच किंवा त्यापेक्षा जास्त गुन्हे दाखल आहे. प्रस्तावित व्यक्तींचा संपूर्ण गुन्हेगारी अभिलेख एकत्रित करून सदरचे प्रस्ताव बनवण्यात आले आहे. याच आधारे गेल्या महिन्यात 33 गुन्हेगारांचे हद्दपारीचे प्रस्ताव पोलीस अधीक्षकांकडे पाठविण्यात आले आहे.

नव्याने 15 प्रस्ताव: त्या पाठोपाठ या महिन्यात देखील यात आणखी वाढ झाली असून नव्याने 15 जणांचे प्रस्ताव पाठविण्यात आले. महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55, कलम 56, कलम 57 अंतर्गत सदरचे प्रस्ताव तयार करण्यात आलेले असून महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 अर्थात गॅंग तडीपारीचे दहा व्यक्ती विरोधात दोन प्रस्ताव, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 56 अंतर्गत पाच जणांविरोधात 5 प्रस्तावांचा समावेश आहे. या सर्वांना दोन वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्याची मागणी या प्रस्तावाद्वारे करण्यात आली आहे.

शहर पोलीस ठाण्यातून सर्वाधिक प्रस्ताव: यात संगमनेर शहर पोलीस ठाण्यातून 10, तालुका पोलीस ठाण्यातून 2, अकोले पोलीस ठाण्यातून 2 व घारगाव पोलीस ठाण्यातून एका व्यक्ती विरोधात हे प्रस्ताव तयार करण्यात आले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,173
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

‘आरोपी अजूनही त्रास देतोय का?’ पीडित महिलांना पोलिसांचा फोन जाताच उघड झाली ‘ही’ मोठी माहिती

19/10/2026

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

18/10/2026

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

बुधवार, २१ ऑक्टोंबर —- आजच्या दिवसाचे राशिभविष्य

By Annant Ppangarkar21/10/20260

आजचे राशिभविष्य – मेष – आजचा दिवस आपल्या मर्जीनुसार आणि आनंदात जाईल. सरकारी किंवा खाजगी…

“सर्व अडचणी दूर होऊन जनतेच्या जीवनात सुख-समाधान नांदो!”; नवरात्रोत्सवात माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांची भावूक प्रार्थना

20/10/2026

संगमनेरात विजयादशमीला आरएसएसचे पथसंचलन! स्वयंसेवकांच्या रुपात आमदार अमोल खताळ पाटलांची एन्ट्री

20/10/2026

मंगळवार, २० ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमची रास आज काय सांगते

20/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.