Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नगरच्या पत्रकारितेला झाले तरी काय! बाळ बोठे पाठोपाठ आणखी एका खून प्रकरणात सायं दैनिकाच्या संपादकाला अटक
गुन्हेगारी

नगरच्या पत्रकारितेला झाले तरी काय! बाळ बोठे पाठोपाठ आणखी एका खून प्रकरणात सायं दैनिकाच्या संपादकाला अटक

लोणीजवळ आढळलेल्या लष्करी जवानाच्या खून प्रकरणाची उकल
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar31/07/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

अहमदनगर – लोणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. एवढेच नव्हे तर या व्यक्तीचा घातपात झाल्याने या खून प्रकरणाची उकल देखील झाली आहे. या खून प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने नगर शहरातील एका सायं दैनिकाच्या मालकासह दोघांना अटक केली आहे. मनोज वासुमल मोतीयानी (वय ३३) व स्वामी प्रकाश गोसावी (वय २८, दोघे रा. सावेडी गाव, अ.नगर) असे पकडलेल्या आरोपींची नावे आहेत.

नेमकी काय होती घटना: अहमदनगर शहरातून बेपत्ता झालेल्या निवृत्त लष्करी जवानाचा मृतदेह लोणी येथे रक्ताच्या थारोळ्यात सापडला होता. बोल्हेगावमधील गणेश चौक येथे राहणाऱ्या सुरेखा भोर यांनी आपले पती निवृत्त लष्करी जवान असलेले विठ्ठल भोर हे सापडत नसल्याची तक्रार तोफखाना पोलीस स्टेशनला दाखल केली होती. 29 तारखेला दुपारी चार नंतर त्यांचा फोन लागत नसून ते घरी आले नसल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले होते. तोफखाना पोलिसांनी त्यांना शोधण्यासाठी दोन पथके रवाना केली होती. मात्र त्यांचा मोबाईलही बंद असल्याने त्यांचा ठाव ठिकाणा लागत नव्हता. रविवारी दुपारी विठ्ठल भोर यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात लोणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत लोणी तळेगाव रोडचा बाजूला गोगलगाव हद्दीत सापडला. मृतदेह पाहता क्षणी त्यांचा खून झाला असल्याचे स्पष्ट दिसत होते.

पोलिसांनी तपास हाती घेत गुन्ह्याची उकल केली: नगरच्या बोल्हेगाव उपनगरात राहणार्‍या सेवानिवृत्त लष्करी जवानाचा प्लॉटच्या वादातून धारदार शस्त्राने वार करत खून केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. आरोपींनी मृतदेह राहाता तालुक्यातील लोणी पोलिस ठाण्याच्या हद्दीत रस्त्याच्या कडेला फेकून देत पसार झालेल्या दोघांना पोलिसांनी सेंधवा, मध्यप्रदेश येथे पकडले आहे.

पोलीस तपास सुरू: याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मनोज मोतीयानी याला अटक केली आहे. मोतीयानी हा अहमदनगर घडामोडी हे वर्तमानपत्र चालवितो. त्याशिवाय रिअल इस्टेट व इतरही व्यवसायात त्याचा सहभाग असतो. निवृत्त लष्करी जवान विठ्ठल भोर यांचा मोतीयानीशी संबंध काय? कशासाठी त्यांचा खून केला? खून प्रकरणात मोतीयांनी याचा संबंध कसा आहे? याबाबत पोलिसांनी अद्याप खुलासा केला नाही.

प्राथमिक अंदाजानुसार हे कारण आले समोर: दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार मोतीयानी आणि भोर यांच्यात प्रॉपर्टीवरून वाद होता. दोघेही निंबळक शिवारात प्रॉपर्टी पाहण्यासाठी गेले होते. मनोज मोतीयानी सोबत स्वामी प्रकाश गोसावी हा देखील होता. तेथे त्यांच्यात वाद झाले. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यावेळी विठ्ठल भोर यांचा स्क्रू ड्रायव्हरने भोकसून खून करण्यात आला. भोर यांचा मृतदेह लोणी शिवारात टाकून मोतीयानी आणि गोसावी मध्यप्रदेशमध्ये पसार झाले.

या आधीही महिलेच्या खून प्रकरणात संपादक आहे कोठडीत: यापूर्वी नगर जिल्ह्यातील एका मान्यवर दैनिकाचा संपादक बाळ बोठे हा रेखा जरे या महिलेच्या खून प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असताना आता सायं दैनिकाचा संपादक मनोज मोतीयानी देखील खून प्रकरणात तुरुंगात गेल्याने खळबळ उडाली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,160
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सांत्वन

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

By Annant Ppangarkar02/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जवळेकडलग येथील अकरा वर्षीय बालक कृष्णा वसंत पवार याचा…

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.