Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » व्वा रे नायब तहसीलदार साहेब; महसूल सप्ताहातच शेतकऱ्याकडून घेतली तीन हजाराची लाच
गुन्हेगारी

व्वा रे नायब तहसीलदार साहेब; महसूल सप्ताहातच शेतकऱ्याकडून घेतली तीन हजाराची लाच

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar03/08/2023Updated:03/08/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

एक ऑगस्ट पासून राज्यात सर्वत्र महसूल सप्ताह सुरू आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून महसूल प्रशासन लोकाभिमुख आणि गतिमान करण्यासाठी सुरू असलेल्या या उपक्रमातच निवासी नायब तहसीलदाराने शेतकऱ्याकडून तीन हजाराची लाच घेतल्याचे समोर आले आहे. लाचखोर नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात अडकला असून त्याला अटक करण्यात आले आहे.

काय आहे महसूल सप्ताह : शासनाच्या आदेशाने राज्यात महसूल विभागामार्फत 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान सर्वत्र महसूल सप्ताह साजरा करण्यात येत आहे. महसूल प्रशासन लोकाभिमुख आणि गतिमान करण्यासाठी हा सप्ताह यशस्वी व्हावा यासाठी महसूल मंत्री विखे पाटील यांनी महसूल विभागासह सर्व यंत्रणांना निर्देश दिलेले आहेत. या माध्यमातून प्रशासन जनतेपर्यंत पोहोचणार असून याद्वारे विविध कामे मार्गी लागणार आहेत. सप्ताहाच्या कालावधीत राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असताना वर्धा जिल्ह्यातून एक अजब प्रकार समोर आला आहे.

नेमकं काय घडलं : वर्धाचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी महसूल सप्ताह कालावधीत जास्तीत जास्त नागरिकांना सेवा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत एकीकडे हा कार्यक्रम जोरात सुरू असताना दुसरीकडे देवळी येथील लोकसेवक नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात अडकला आहे. अँटी करप्शनच्या अधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयात लावलेल्या सापळ्यात शेतकऱ्याकडून तीन हजार रुपयांची लाच घेताना नायब तहसीलदार किशोर शेंडे अलगद अडकला. वर्धा येथील मास्टर कॉलनी मधील रहिवासी असलेल्या शेतकऱ्यांचे आपसात वाटणी पत्र तयार करण्याचे काम होते. यासाठी त्या तक्रारदार शेतकऱ्यांने वारंवार तहसील कार्यालयात चकरा मारल्या. मात्र वाटणीपत्र तयार करण्यासाठी नायब तहसीलदार किशोर शेंडे याने त्यांच्याकडे दहा हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीमध्ये आठ हजार रुपयात हा व्यवहार पक्का झाला होता.

असा अडकला जाळ्यात : संबंधित शेतकऱ्याने अँटी करप्शनकडे या संदर्भात तक्रार दाखल केली. त्यानंतर अँटी करप्शनने लाचखोर नायब तहसीलदाराला पकडण्यासाठी सापळा लावला. सर्वत्र महसूल दिन साजरा होत असताना नायब तहसीलदार शेंडे यांनी तक्रारदार शेतकऱ्याला पैसे घेऊन तहसील कार्यालयात बोलावले होते. तक्रारदाराने आपल्या जवळील तीन हजार रुपयांची रक्कम नायब तहसीलदार शेंडे याला देतात अँटी करप्शन च्या पथकाने त्याला रंगेहात पैसे घेताना पकडले. लाचखोर शेंडे आला अटक करण्यात आली आहे. एकीकडे महसूल सप्ताह सुरू असताना दुसरीकडे लाचखोर नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात अडकल्याने महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,101
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

By Annant Ppangarkar03/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: समाजमाध्यमांच्या माध्यमातून खरेदी केलेल्या आणि नशेसह शारीरिक ताकदीसाठी बेकायदेशीरपणे…

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.