Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दूधगंगा पतसंस्थेतील आर्थिक घोटाळ्याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करण्यास परवानगी; अध्यक्ष, व्यवस्थापक चीफ अकाउंटविरोधात जबाबदारी निश्चित
गुन्हेगारी

दूधगंगा पतसंस्थेतील आर्थिक घोटाळ्याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करण्यास परवानगी; अध्यक्ष, व्यवस्थापक चीफ अकाउंटविरोधात जबाबदारी निश्चित

गुन्हे दाखल होणार असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar13/08/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – येथील अर्थकारणात अग्रेसर असलेल्या दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेत झालेल्या मोठ्या आर्थिक अपहार प्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यास जिल्हा उपनिबंधाकडून विशेष लेखापरीक्षकांना परवानगी देण्यात आली आहे. संस्थेचे अध्यक्ष आणि राजकीय नेते भाऊसाहेब कुटे यांना देखील या प्रकरणी दोषी धरण्यात आले असून आरोपींमध्ये त्यांचा देखील रहाण्याची शक्यता आहे.

अपहाराचा नेमका आकडा समोर येणार: गुन्हे दाखल करण्यास परवानगी मिळाल्याने लवकरच संबंधितांवर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. गुन्हा केव्हा दाखल होतो याकडे ठेवीदार सभासदांचे लक्ष लागले आहे. या संस्थेत ठेविदारांचा पैसा मोठ्या प्रमाणात अडकला आहे. नेमका किती रुपयांचा अपहार आहे याची अद्याप सहकार विभागाकडून स्पष्टता नसली तरी कोट्यावधी रुपयांच्या घरात हा अपहार असून सुमारे 98 कोटी रुपयांच्या आसपास ही रक्कम असल्याचे बोलले जात आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर नेमकी अपहाराची रक्कम समोर येणार आहे.

यांच्यावर जबाबदारी निश्चित: मोठ्या प्रमाणात झालेल्या आर्थिक अपहाराच्या कारणावरून दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्था गेल्या दोन-तीन वर्षांपासून चर्चेत आहे. राजकीय पाठबळामुळे या संस्थेतील गैरव्यवहार अद्याप समोर येत नसल्याचे बोलले जात होते. तसेच अपहर करणाऱ्यांची नावे देखील गुलदस्त्यात आहेत. जिल्हा उपनिबंधकांनीच आता या संदर्भात पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची परवानगी दिल्याने या प्रकरणातील सर्वच आरोपी समोर येण्याची चिन्हे निर्माण झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब कुटे, व्यवस्थापक भाऊसाहेब गुंजाळ आणि चीफ अकाउंटंट यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.

असा आला अपहार समोर: मध्यंतरीच्या काळात अचानकपणे या संस्थेचे व्यवहार बंद करण्यात आल्याने तसेच संस्थेला कुलूप लावण्यात आल्याने संस्थेत मोठ्या प्रमाणावर आर्थिक अपहार झाल्याची चर्चा सभासद तसेच ठेविदारांमधून सुरू झाली होती. तसेच पतसंस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब कुटे यांनी देखील पतसंस्थेतील काही कर्मचाऱ्यांनी आर्थिक अपहार केल्याने ठेवीदारांना त्यांचे पैसे देण्यासाठी पैसे उपलब्ध नसल्याचे जाहीर केले. या संदर्भात कुटे यांनी शहर पोलीस व जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे तक्रार केली होती.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,431
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सांत्वन

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

By Annant Ppangarkar02/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जवळेकडलग येथील अकरा वर्षीय बालक कृष्णा वसंत पवार याचा…

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.