Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

July 19, 2026

रविवार विशेष लेख — सोनमजी, तुम्ही देशाला हवे आहात!

July 19, 2026

आज, रविवार १९ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 19, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दूधगंगाच्या 81 कोटीच्या गैरव्यवहार प्रकरणी व्यवस्थापक अटकेत, अटकेतील आरोपींची संख्या पाचवर… मुख्य आरोपीसह अन्य आरोपी अद्यापही फरार
गुन्हेगारी

दूधगंगाच्या 81 कोटीच्या गैरव्यवहार प्रकरणी व्यवस्थापक अटकेत, अटकेतील आरोपींची संख्या पाचवर… मुख्य आरोपीसह अन्य आरोपी अद्यापही फरार

पोलीस तपासाकडे संगमनेरकरांसह ठेविदारांचे लागले लक्ष
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरAugust 21, 2023Updated:August 21, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – संगमनेरच्या सहकार विश्वाला बदनाम करणाऱ्या तब्बल 81 कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी पोलिसांनी बँकेच्या मुख्य आरोपींपैकी व्यवस्थापकाला अटक केली आहे. राजकीय वरदहस्त असलेला मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे याच्यासह अन्य आरोपी अद्यापही फरार आहेत. पोलीस आरोपींच्या मागावर असल्याची माहिती तपास अधिकारी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी दिली.

उद्या न्यायालयात हजर करणार: संगमनेरच्या पतसंस्था विश्वातील सर्वात मोठ्या तब्बल 81 कोटीच्या अपहार प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत बँकेच्या तीन कॅशियरसह लेखापरीक्षकाला अटक केली होती. त्यांना येत्या 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर आता पोलिसांनी बँकेचा व्यवस्थापक भाऊसाहेब विठ्ठल गुंजाळ याला अटक केली आहे. गुंजाळ याला उद्या न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. गुंजाळ हा या गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य आरोपीपैकी एक आरोपी आहे. पतसंस्थेतील हा घोटाळा काही ठराविक व्यक्तीभोवती केंद्रित झाला आहे.

संगमनेरच्या पतसंस्था विश्वातील सर्वात मोठा घोटाळा: संस्थेचा अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब कुटे, व्यवस्थापक भाऊसाहेब गुंजाळ, चीफ अकाउंटंट भाऊसाहेब संतू गायकवाड यांच्यासह सतरा जणांनी तब्बल 80 कोटी 79 लाख 41 हजार 981 रुपयांचा अपहार केला असून याप्रकरणी त्यांना सहा आरोपींनी मदत केली असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अहमदनगरचे जिल्हा विशेष लेखा परीक्षक राजेंद्र फकीरा निकम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब कुटे यांच्यासह त्यांचे कुटुंबीय, सन 2016 ते 2021 पर्यंत संस्थेत कार्यरत असलेले चार लेखापरीक्षक, दोन वैधानिक लेखापरीक्षक अशा तब्बल 21 जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

मुख्य आरोपीसह अन्य आरोपी अद्यापही फरार: अध्यक्ष त्यांच्या नातेवाईकासह बहुतांशी आरोपी फरार झाले असून गुन्हा दाखल होताच पोलिसांनी नाशिक येथून अमोल प्रकाश क्षीरसागर याला तर संगमनेरमधून गणपत कुटे, उल्हास रावसाहेब थोरात, सोमनाथ कारभारी सातपुते या तिघांना अटक केली होती.

हे आहेत आरोपी: भाऊसाहेब दामोदर कुटे, भाऊसाहेब विठ्ठल गुंजाळ, भाऊसाहेब संतु गायकवाड, चेतन नागराज बाबा कपाटे उर्फ सुदर्शन महाराज, दादासाहेब भाऊसाहेब कुटे, संदीप भाऊसाहेब कुटे, अमोल भाऊसाहेब कुटे, विमल भाऊसाहेब कुटे, शकुंतला भाऊसाहेब कुटे, अमोल कृषी सेवा केंद्र (सोनाली दादासाहेब कुटे), अमोल ट्रेडिंग कंपनी (दादासाहेब भाऊसाहेब कुटे), श्री डेव्हलपर्स (संदीप भाऊसाहेब कुटे), कृष्णराव श्रीपतराव कदम, श्रीमती प्रमिला कृष्णराव कदम, अजित कृष्णराव कदम, सुजित कृष्णराव कदम, संदीप दगडू जरे या सतरा जणांनी तब्बल 80 कोटी 79 लाख 41 हजार 981 रुपयांचा अपहार केला असून याप्रकरणी त्यांना लहानु गणपत कुटे, उत्तम शंकर लांडगे, उल्हास रावसाहेब थोरात, सोमनाथ कारभारी सातपुते या कॅशियरसह अरुण बुरड व अमोल शिरसागर या सहा जणांनी मदत केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,782
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

कोतुळमध्ये ६ लाखांचा गुटखा व कार जप्त; पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाची मोठी कारवाई

July 17, 2026

जिओ पेट्रोल पंपाच्या नावाखाली अहिल्यानगरच्या व्यावसायिकाला ८४ लाखांचा गंडा

July 16, 2026

संगमनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

July 15, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पत्रकारिता

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

By अनंत पांगारकरJuly 19, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मोहसीन शेख | संगमनेर अतिक्रमण निर्मूलनाच्या नावाखाली प्रशासनाने हातावर पोट असणाऱ्या…

रविवार विशेष लेख — सोनमजी, तुम्ही देशाला हवे आहात!

July 19, 2026

आज, रविवार १९ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 19, 2026

संगमनेर तालुक्यात ७५ टक्के पेरण्या पूर्ण; पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतेत, दुबार पेरणीचे संकट

July 18, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.