Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

July 19, 2026

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

July 19, 2026

रविवार विशेष लेख — सोनमजी, तुम्ही देशाला हवे आहात!

July 19, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दूधगंगा पतसंस्था ८१ कोटी गैरव्यवहार प्रकरण: व्यवस्थापकाच्या पोलीस कोठडी प्रकरणी न्यायालयाने दिला हा निर्णय…
गुन्हेगारी

दूधगंगा पतसंस्था ८१ कोटी गैरव्यवहार प्रकरण: व्यवस्थापकाच्या पोलीस कोठडी प्रकरणी न्यायालयाने दिला हा निर्णय…

संगमनेरातील मोठ्या राजकीय पुढाऱ्याचा बहुचर्चित घोटाळा
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरAugust 22, 2023Updated:August 22, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – संगमनेरच्या आदर्श सहकारावर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या दूधगंगा नागरी पतसंस्थेच्या 81 कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी संगमनेर पोलिसांनी अटक केलेल्या व्यवस्थापक भाऊसाहेब विठ्ठल गुंजाळ याला संगमनेरच्या न्यायालयाने 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी: व्यवस्थापक भाऊसाहेब विठ्ठल गुंजाळ याला सोमवारी पोलिसांनी अटक केली होती. मंगळवारी त्याला संगमनेरच्या प्रथमवर्ग न्यायालयात पोलीस कोठडी मिळण्यासाठी तपास अधिकारी तथा पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी हजर केले. न्यायाधीश एस. एम. वाघचौरे यांनी आरोपीला 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. कोठडी दरम्यान आरोपी कडून आणखी काय माहिती समोर येते. हे 24 ऑगस्टला समजणार आहे.

सहकाराची विश्वासार्हता धोक्यात: संगमनेरचे अर्थकारण सहकारावर आधारित असून येथील सहकारी पतसंस्थांनी सामान्य माणसाला पत मिळवून देण्याचे काम केले. मात्र आता याच पतसंस्था त्यातील कारभाऱ्यांसाठी गैरव्यवहाराच्या कुरण बनल्या असल्याचे समोर येत आहे. सहकारातील नावलौकिक असलेल्या आणि माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सुरू असलेली शेतकऱ्यांची कामधेनू ठरलेल्या दूधगंगा नागरी पतसंस्थेचा पतसंस्था विश्वातील सर्वात मोठा अपहराचा प्रकार समोर आला आहे.

कोण आहे मुख्य आरोपी: तत्कालीन काँग्रेस नेता, जिल्हा परिषद सदस्य, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचा उपाध्यक्ष अशी विविध पदे उपभोगलेल्या भाऊसाहेब कुटे याने घरातील सदस्य, नातेवाईकांसह अन्य काही जणांच्या मदतीने तब्बल 81 कोटी रुपयांचा अपहार केल्याचे समोर आले आहे. कुटे याच्यासह पत्नी, मुल, सुन, बँकेचा व्यवस्थापक, लेखापरीक्षकांसह तब्बल 21 जणांविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष: मुख्य आरोपी कुटे परिवारातील अन्य आरोपी सदस्यांसह फरार आहे. कुटे याला पकडण्यात संगमनेर पोलीस यशस्वी होतात की कुटे स्वतः सह परिवाराला जामीन मिळविण्यात यशस्वी होतो हे लवकरच समजणार आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 2,854
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

कोतुळमध्ये ६ लाखांचा गुटखा व कार जप्त; पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाची मोठी कारवाई

July 17, 2026

जिओ पेट्रोल पंपाच्या नावाखाली अहिल्यानगरच्या व्यावसायिकाला ८४ लाखांचा गंडा

July 16, 2026

संगमनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

July 15, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आरोग्य

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

By अनंत पांगारकरJuly 19, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर: घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील बेफिकीर आणि ढिसाळ कारभाराचा प्रत्यक्ष अनुभव आल्यानंतर…

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

July 19, 2026

रविवार विशेष लेख — सोनमजी, तुम्ही देशाला हवे आहात!

July 19, 2026

आज, रविवार १९ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 19, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.