Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचा संगमनेरातील कत्तलखान्यावर छापा; एकाला पकडले तर दुसरा पळाला… कारवाईत मिळाला एवढा मुद्देमाल
गुन्हेगारी

अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचा संगमनेरातील कत्तलखान्यावर छापा; एकाला पकडले तर दुसरा पळाला… कारवाईत मिळाला एवढा मुद्देमाल

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar22/08/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संगमनेर शहरात सुरू असलेल्या बेकायदेशीर कत्तलखान्यावर कारवाई करत सुमारे 600 किलो जनावराच्या गोमांसासह सुमारे सव्वाचार लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून एक जण घटनास्थळावरून पसार झाला आहे.

या कर्मचाऱ्यांनी केली कारवाई: नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या आदेशावरून गुन्हे शाखेचे पोलीस हेडकॉन्स्टेबल दत्तात्रय गव्हाणे, पोलीस नाईक संतोष लोंढे, गणेश भिंगारदे, पोलीस कॉन्स्टेबल अशोक गुंजाळ, अमृत आढाव, सचिन अडबल यांचे पथक अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी संगमनेरमध्ये गस्त घालत होते. या पथकाला जुने जोर्वे रोड परिसरातील जमजम कॉलनीत अब्दुल हमीद कुरेशी हा गोवंश जनावरांची कत्तल करून त्याचे मांस एका छोटा हत्ती टेम्पोत भरत असल्याची माहिती मिळाली होती.

पाठलाग करून एकाला पकडले: या पथकाने संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब यादव, पोलीस नाईक लुमा भांगरे, पोलीस कॉन्स्टेबल संतोष बाचकर यांना सोबत घेत मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी सोमवारी रात्री साडेआठ वाजता छापा टाकला असता घटनास्थळी एका पत्राच्या शेडजवळ दोन व्यक्ती एका छोटा हत्ती टेम्पोमध्ये गोमांस भरत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी छापा टाकल्याचे दिसतात या दोन्ही व्यक्ती घटनास्थळावरून पळून जाऊ लागले असता पोलिसांनी पाठलाग करत त्यापैकी एकाला पकडले. तर दुसरा पळून जाण्यात यशस्वी झाला.

मिळाला हा मुद्देमाल: घटनास्थळावरून पोलिसांनी एक टाटा कंपनीचा (MH04 GC 4846) चार चाकी टेम्पो, त्यात सुमारे 80 हजार रुपये किमतीचे 400 किलो गोमांस, पत्र्याच्या वाड्यातून 40 हजार रुपये किमतीचे 200 किलो गोमांस, लोखंडी सत्तुर, सुरा असा चार लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला. पकडलेल्या आरोपीकडे चौकशी केली असता त्याचे नाव अब्दुल हमीद अहमद कुरेशी (वय 29 वर्ष, रा. गल्ली नंबर 6, जमजम कॉलनी, संगमनेर) तर पळून गेलेल्या व्यक्तीचे नाव मोहम्मद शमशाद आलम शेख (रा. जमजम कॉलनी, संगमनेर) असे असल्याचे निष्पन्न झाले.

याच्या विरोधात गुन्हा: संगमनेर शहर पोलीस ठाण्यात पोलीस नाईक सचिन दत्तात्रय अडबल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी अब्दुल हमीद अहमद कुरेशी याच्या विरोधात भादवी कलम 269, 34, महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 5 (सी) व 9 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस पुढील तपास करत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 674
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

By Annant Ppangarkar03/09/20260

Annant Ppangarkar मुंबई: माहिती अधिकाराचे प्रणेते आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे…

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.