Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

July 19, 2026

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

July 19, 2026

रविवार विशेष लेख — सोनमजी, तुम्ही देशाला हवे आहात!

July 19, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दूधगंगा पतसंस्था 81 कोटीचा अपहार प्रकरण: मास्टरमाईंड कुटेसह अन्य आरोपींच्या अडचणीत वाढ; पोलिसांनी आता नव्याने लावले MPID चे कलम…
गुन्हेगारी

दूधगंगा पतसंस्था 81 कोटीचा अपहार प्रकरण: मास्टरमाईंड कुटेसह अन्य आरोपींच्या अडचणीत वाढ; पोलिसांनी आता नव्याने लावले MPID चे कलम…

मुख्य आरोपीसह बारा आरोपी अद्यापही फरार
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरAugust 24, 2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – संगमनेरच्या आर्थिक क्षेत्रात नावलौकिक असलेल्या दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेत तब्बल 81 कोटीचा अपहार करणाऱ्या चेअरमन मास्टरमाईंड भाऊसाहेब कुटे याच्यासह अन्य आरोपींच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. शहर पोलिसांनी या गुन्ह्यांमध्ये आता नव्याने MPID चे कलम तीन वाढविले आहे.

आत्तापर्यंत पाच आरोपी अटकेत: दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्था अपहार प्रकरणी संस्थेचा चेअरमन भाऊसाहेब कुटे, व्यवस्थापक भाऊसाहेब गुंजाळ, चीफ अकाउंट भाऊसाहेब संतू गायकवाड यांच्यासह 21 जणांविरोधात आर्थिक घोटाळ्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी रात्रीतून चार जणांना अटक केली होती. त्या पाठोपाठ बँकेचा व्यवस्थापक भाऊसाहेब गुंजाळ याला देखील अटक केली होती. मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे आपल्या कुटुंबीयासह तसेच अन्य आरोपी अद्यापही फरार आहेत.

हे आहेत आरोपी: भाऊसाहेब दामोदर कुटे, भाऊसाहेब विठ्ठल गुंजाळ, भाऊसाहेब संतु गायकवाड, चेतन नागराज बाबा कपाटे उर्फ सुदर्शन महाराज, दादासाहेब भाऊसाहेब कुटे, संदीप भाऊसाहेब कुटे, अमोल भाऊसाहेब कुटे, विमल भाऊसाहेब कुटे, शकुंतला भाऊसाहेब कुटे, अमोल कृषी सेवा केंद्र (सोनाली दादासाहेब कुटे), अमोल ट्रेडिंग कंपनी (दादासाहेब भाऊसाहेब कुटे), श्री डेव्हलपर्स (संदीप भाऊसाहेब कुटे), कृष्णराव श्रीपतराव कदम, श्रीमती प्रमिला कृष्णराव कदम, अजित कृष्णराव कदम, सुजित कृष्णराव कदम, संदीप दगडू जरे या सतरा जणांनी तब्बल 80 कोटी 79 लाख 41 हजार 981 रुपयांचा अपहार केला असून याप्रकरणी त्यांना सहा आरोपींनी मदत केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

या कलमानुसार गुन्हा दाखल: संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अहमदनगरचे जिल्हा विशेष लेखा परीक्षक राजेंद्र फकीरा निकम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब कुटे यांच्यासह त्यांचे कुटुंबीय, सन 2016 ते 2021 पर्यंत संस्थेत कार्यरत असलेले चार लेखापरीक्षक, दोन वैधानिक लेखापरीक्षक अशा तब्बल 21 जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 420, 408, 409, 465, 467, 471, 477-A नुसार गुन्हा दाखल केला होता. आता यात नव्याने MPID (महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हित संबंधाचे संरक्षण अधिनियम 1999) कायद्याचे कलम तीन वाढविले आहे. यामुळे आरोपींच्या अडचणीत वाढ झाली आहे.

समृद्ध सहकार अडचणीत: ज्येष्ठ नेते, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी रुजविलेल्या आणि माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली राज्याला दिशादर्शक ठरलेल्या सहकाराला त्यांच्याच एका तत्कालीन राजकीय पदाधिकाऱ्याने काळीमा फासला आहे. थोरात यांच्या माध्यमातून सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यासह विविध संस्था, स्थानिक स्वराज्य संस्थेत महत्त्वपूर्ण पदे उपभोगणाऱ्या भाऊसाहेब कुटे याने दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेत केलेल्या आर्थिक घोटाळ्याने संगमनेरच्या आर्थिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

काय आहे MPID (महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम १९९९) चे कलम ३…

वित्तीय संस्थेने केलेली कपटपूर्ण कसूर : जिने अभिवचन दिल्याप्रमाणे मुदत संपल्यानंतर व्याज, लाभांश, फायदा यांच्या स्वरूपातील किंवा कोणत्याही अन्य स्वरूपातील कोणत्याही लाभासह ठेवींची कोणतीही परतफेड करण्यात कपटपूर्ण रीतीने कसूर केली असेल किंवा आश्वासन दिल्याप्रमाणे ठेवीच्या बदल्यात सेवा देण्यात कपटपूर्ण रीतीने कसूर केली असेल अशा कोणत्याही वित्तीय आस्थापनेस अशा वित्तीय व्यवस्थापनास किंवा तिचा धंदा अथवा कामकाज चालविण्यास जबाबदार असलेल्या प्रवर्तक, आस्थापनेचा भागीदार, संचालक, व्यवस्थापक किंवा कोणतीही अन्य व्यक्ती किंवा कर्मचारी यांसह, प्रत्येक व्यक्तीस, अपराधसिद्धीनंतर सहा वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कारावासाची आणि एक लाख रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या दंडाची शिक्षा देण्यात येईल आणि अशी वित्तीय आस्थापना देखील एक लाख रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या दंडाची शिक्षा केली जाण्यास पात्र ठरेल.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 2,047
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

कोतुळमध्ये ६ लाखांचा गुटखा व कार जप्त; पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाची मोठी कारवाई

July 17, 2026

जिओ पेट्रोल पंपाच्या नावाखाली अहिल्यानगरच्या व्यावसायिकाला ८४ लाखांचा गंडा

July 16, 2026

संगमनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

July 15, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आरोग्य

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

By अनंत पांगारकरJuly 19, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर: घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील बेफिकीर आणि ढिसाळ कारभाराचा प्रत्यक्ष अनुभव आल्यानंतर…

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

July 19, 2026

रविवार विशेष लेख — सोनमजी, तुम्ही देशाला हवे आहात!

July 19, 2026

आज, रविवार १९ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 19, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.