Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरचा रहिवासी असलेल्या कालवा निरीक्षक श्रीरामपूरमध्ये लाच लूचपतच्या जाळ्यात… चाळीस हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने तिघे पकडले
गुन्हेगारी

संगमनेरचा रहिवासी असलेल्या कालवा निरीक्षक श्रीरामपूरमध्ये लाच लूचपतच्या जाळ्यात… चाळीस हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने तिघे पकडले

नासिक विभागात लाचखोरांचा धुमाकूळ
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/08/2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

अहमदनगर – सिंचनासाठी शेतकऱ्याला पाटबंधारे विभागामार्फत देण्यात येणारे पाणी अविरत चालू राहू देण्यासाठी शेतकऱ्याकडे 85 हजार रुपयांची मागणी करून चाळीस हजार रुपयांवर तडजोड तडजोड करत दोघा खाजगी व्यक्तींच्या मध्यस्थीने लाचखोरी करणाऱ्या कालवा निरीक्षकासह तिघांना अहमदनगरच्या अँटी करप्शनने पकडले आहे. श्रीरामपूर पोलीस ठाण्यात या तीन लाचखोराविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

हे आहेत लाचखोर: अंकुश सुभाष कडलग (वय ४२ वर्ष) हा संगमनेर शहरालगतच्या बटवाल मळा, सावित्रीबाई फुले नगर, ढोलेवाडीमधील रहिवासी असून सध्या तो श्रीरामपूरमध्ये वडाळा उपविभागाअंतर्गत नॉर्दन ब्रांच येथील सिंचन शाखेत कालवा निरीक्षक म्हणून कार्यरत आहे. कडलग याने अनिस सुलेमान शेख, (वय- ३४ वर्ष, धंदा-शेती, (खाजगी इसम) रा. निमगाव खैरी, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर) व संजय भगवान करडे, (वय-३८ वर्ष, धंदा-फुल व्यवसाय, (खाजगी इसम) रा. मोरगे वस्ती, ता. श्रीरामपूर, जि.अहमदनगर) यांच्यामार्फत ही लाचखोरी केल्याचे समोर आले आहे.

लाच मागणीचे कारण: श्रीरामपूर तालुक्यातील महांकाळ वडगाव येथील तक्रारदार यांनी सुनेचे नावे महाराष्ट्र शेती विकास महामंडळ यांचे मालकीची हरेगाव मळा येथील गट नंबर ३ मधील ३१९ एकर शेती दहा वर्षाच्या करार पद्धतीने कसण्यास घेतलेली आहे. तक्रारदार यांनी सदर क्षेत्रापैकी ६० एकरावर ऊस लागवड केली. सदर शेतीस पाटबंधारे विभागाचे आवर्तनाद्वारे पाणी मिळते. शेतकऱ्याला दर तीन महिन्यांनी पाटबंधारे विभागाकडे पाणीपट्टी भरावी लागते.

तक्रारदार यांना माहे जानेवारी २०२३ ते मार्च २०२३ या कालावधीत रुपये २६,२८०/- रुपये पाणीपट्टी आली होती. सदरची पाणीपट्टी तक्रारदार शेती महामंडळाच्या हरेगाव येथील कार्यालयात भरतात. महामंडळातर्फे सदर पाणीपट्टी पाटबंधारे विभागास वर्ग केली जाते. तक्रारदार यांचे ६० एकर उसाचे क्षेत्र आहे पैकी ३५ एकर क्षेत्रासाठी शेतात असलेल्या विहीर व बोअरद्वारे ते सिंचन करतात. उर्वरित २५ एकरसाठी पाटबंधारे विभागाकडून कालव्याचे पाणी घेतात.

या कारणासाठी मागितली लाच: यातील आरोपी लोकसेवक कालवा निरीक्षक अंकुश कडलग यांनी तक्रारदार यांना त्यांचे शेती सिंचनाचे क्षेत्र जास्त असल्याचे सांगून पाटबंधारे विभागामार्फत देण्यात येणारे पाणी अविरत चालू राहू देण्यासाठी एकूण ८५,०००/- रुपये लाचेची मागणी केली त्यामुळे संबंधित शेतकऱ्याने अहमदनगरचा लाचलुचपत विभागाशी संपर्क साधून यासंदर्भात तक्रार केली होती.

पकडण्यासाठी लावला सापळा: लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या मार्फत या तक्रारीची पडताळणी करण्यात आली कालवा निरीक्षक कडलग याने अनिस शेख यांच्या मध्यस्थीने तक्रारदाराकडे ८५ हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडी अंती ४०,०००/- रुपयांवर व्यवहार पक्का झाला. याला आरोपीने फोनवरील संभाषणाद्वारे दुजोरा दिला असता शुक्रवारी (ता. २५ ऑगस्ट) लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी सापळा लावत कालवा निरीक्षक अंकुश कडलग याने तक्रारदार यांचेकडून पंचा समक्ष ४०,०००/- रुपये लाचेची रक्कम स्वीकारत खाजगी इसम संजय करडे याच्याकडे ते हस्तांतरित केली असता लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी या तिघांनाही ताब्यात घेतले.

यांनी केली कारवाई: लाचलुचपतचे पोलीस उपाधीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आर बी आल्हाट यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार वैभव पांढरे, बाळासाहेब कराड, सचिन सुद्रुक पोलीस हेड कॉन्स्टेबल दशरथ लाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कोणी तुमच्याकडे लाचेची मागणी करीत असल्यास येथे करा तक्रार…

कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्याने किंवा त्यांच्यावतीने खाजगी इसमाने कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास अँन्टी करप्शन ब्युरो, अहमदनगर, दुरध्वनी- ०२४१- २४२३६७७ किंवा १०६४ या टोल फ्री क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा.

प्रवीण लोखंडे, उपअधीक्षक.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,615
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सांत्वन

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

By Annant Ppangarkar02/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जवळेकडलग येथील अकरा वर्षीय बालक कृष्णा वसंत पवार याचा…

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.