Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

July 19, 2026

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

July 19, 2026

रविवार विशेष लेख — सोनमजी, तुम्ही देशाला हवे आहात!

July 19, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयातील कॉपर पाईप चोरीचा नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने केला उलगडा! संगमनेरातील टोळी अटकेत
गुन्हेगारी

घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयातील कॉपर पाईप चोरीचा नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने केला उलगडा! संगमनेरातील टोळी अटकेत

चोरीचे पाईप घेणारे संगमनेरमधील दोन भंगार व्यावसायिकही पोलिसांच्या रडारवर!
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरAugust 26, 2023Updated:August 26, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

अहमदनगर – संगमनेरच्या घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाची सेंट्रलाइज ऑक्सिजन पाईपलाईन व टर्मिनल तोडून साडेबारा लाखाच्या तांब्याच्या पाईपची चोरी करणारी सहा जणांची आख्खी टोळीच पकडण्यात नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. याशिवाय हे पाईप भंगारमध्ये विकत घेणाऱ्या दोन भंगार व्यावसायिकांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे.

काय होती घटना: ग्रामीण रुग्णालयाच्या ट्रॉमा केअर सेंटरच्या ऑक्सीजन प्लांटमधून साडेबारा लाख रुपयांच्या तांब्याच्या पाईप चोरीचा प्रकार गेल्या सोमवारी समोर आला होता. या संदर्भात रुग्णालयातील परिसेविका शकुंतला पालवे यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला संगमनेर शहर पोलिसांसोबत नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस यासंदर्भात समांतर तपास करत होते.

पोलीस निरीक्षकांना मिळाली आरोपीची माहिती: नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना हा गुन्हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार संदीप उर्फ जब्या संजय वाल्हेकर (रा. वेल्हाळे रोड, संगमनेर) याने त्याच्या साथीदारासह केल्याची माहिती मिळाली. तसेच वाल्हेकर हा त्याच्या साथीदारासह संगमनेरचा प्रवरा नदी तीरावरील गंगामाई घाटावरील केशव तीर्थ मंदिरात येणार असल्याची माहिती मिळाली होती.

असे हाती आले आरोपी: आहेर यांनी आपल्या पथकाला यासंदर्भात कारवाईच्या सूचना दिल्या. पथकाने माहितीच्या आधारे पडताळणी केली असता त्यांना आरोपी संदीप वाल्हेकर हा निखिल उर्फ अजय विजय वाल्हेकर (रा. वेल्हाळे रोड संगमनेर) व सागर बाळू गायकवाड (रा. साठेनगर, घुलेवाडी, संगमनेर) या त्याच्या साथीदारांसह आढळून आला. पोलिसांनी या तिघा आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली देतानाच अक्षय सावन तामचीकर (रा. भाटनगर, घुलेवाडी, संगमनेर), शुभम उर्फ पप्पू बाळू गायकवाड (रा. साठेनगर, घुलेवाडी, संगमनेर) व मयूर राखपसरे (रा. म्हसोबानगर, घुलेवाडी, संगमनेर) या अन्य तीन फरार असलेल्या साथीदारांच्या मदतीने केल्याची कबुली दिली.

या भंगार व्यावसायिकांनी घेतला चोरीचा माल: तसेच या आरोपींनी रुग्णालयाच्या ट्रॉमा केअर सेंटरमधून चोरलेल्या तांब्याच्या पाईपची संगमनेरमधील महिला शाहीन अब्दुल अली खान (रा. इदगाह मैदानाजवळ, संगमनेर) व अफजल अहमद शेख (रा. विजयनगर, कुरण रोड, संगमनेर) यांना विक्री केल्याची कबुली दिली.

हा मुद्देमाल मिळाला: पोलिसांनी चोरीतील मुद्देमालापैकी रुग्णालयाच्या आँक्सीजन लाईनसाठी वापरले जाणारे कॉपर पाईपचे १६० किलो वजनाचे तुकडे असा एकूण ७,२५,६२५/-रुपये किमतीचा मुद्देमाल या सर्वांकडून हस्तगत केला आहे.

यांनी केली कारवाई: पोलीस अधीक्षक राकेश ओला अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय गव्हाणे, पोलीस नाईक सचिन अडबल, रवींद्र कर्डिले, फुरखान शेख, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड, महिला पोलीस नाईक भाग्यश्री भिटे, पोलीस कॉन्स्टेबल आकाश काळे व अमृत आढाव यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 2,467
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

कोतुळमध्ये ६ लाखांचा गुटखा व कार जप्त; पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाची मोठी कारवाई

July 17, 2026

जिओ पेट्रोल पंपाच्या नावाखाली अहिल्यानगरच्या व्यावसायिकाला ८४ लाखांचा गंडा

July 16, 2026

संगमनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

July 15, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आरोग्य

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

By अनंत पांगारकरJuly 19, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर: घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील बेफिकीर आणि ढिसाळ कारभाराचा प्रत्यक्ष अनुभव आल्यानंतर…

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

July 19, 2026

रविवार विशेष लेख — सोनमजी, तुम्ही देशाला हवे आहात!

July 19, 2026

आज, रविवार १९ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 19, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.