Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

“वाकचौरे आता थांबणार नाहीत…!” – एका विधानाने पेटलेली राजकीय चर्चा

June 4, 2026

रोटरी क्लबच्या जयपूर फूट वितरण उपक्रमातून दिव्यांगांना स्वावलंबनाची नवी दिशा; संगमनेरमध्ये ११४ दिव्यांगांना कृत्रिम अवयवांचे वाटप

June 4, 2026

आज गुरुवार, ४ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 4, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणातील सह आरोपी कॅफे मालकाला अटक; एक दिवसांची पोलीस कोठडी! आरोपींची संख्या आठवर
गुन्हेगारी

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणातील सह आरोपी कॅफे मालकाला अटक; एक दिवसांची पोलीस कोठडी! आरोपींची संख्या आठवर

हॉटेल, लॉजेस, कॅफे बनलेत अत्याचाराचे अड्डे
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरAugust 30, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीशी मैत्री करत तिच्यावर वारंवार अत्याचार करणाऱ्या दोघा आरोपींना अटक केल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी मोठे पाऊल उचलले होते. अत्याचारासाठी आरोपींना मदत केल्याच्या कारणावरून सहा जणांना पोलिसांनी सहआरोपी केले आहे. यातील कॅफे मालकाला मंगळवारी पोलिसांनी अटक केली. आत्तापर्यंत पोलिसांनी या प्रकरणात अत्याचार करणाऱ्या दोन आरोपींसह लॉज चालक, कॅफे मालक अशा पाच जणांना अटक केली आहे. मंगळवारी अटक केलेल्या राहुल गौतम भालेराव या कॅफे मालकाला बुधवारी संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश प्रशांत कुलकर्णी यांनी एक दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

विविध ठिकाणी यांनी केला अत्याचार: संगमनेर शहरालगत राहावयास असलेल्या एका अंदाजे १७ वर्षे वयाच्या मुलीवर संगमनेर, शिर्डी, पेमगिरी, विठ्ठल कडा, कऱ्हे घाट येथे आशिष नानासाहेब राऊत (वय २० वर्ष) व किरण सोपान राऊत (वय ३० वर्ष, दोघे रा. मालुंजकर मळा, घुलेवाडी, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) या दोघांनी वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला होता.

लॉज, कॅफे उपलब्ध करून देणाऱ्यांना केले सहआरोपी: पीडित मुलीच्या तक्रारीवरून संगमनेर शहर पोलिसांनी आशिष नानासाहेब राऊत व किरण सोपान राऊत या दोघा प्रमुख आरोपींसह त्यांना मदत करणाऱ्या अत्याचारासाठी कॅफे, लॉज उपलब्ध करून देणाऱ्या अन्य पाच जणांना सहआरोपी करत या सर्वांवर भारतीय दंड विधान संहिता कलम ३७६(२)(एन), ३६३ आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण प्रतिबंधक कायदा कलम ४, ६, ८, १२ व १७ (पोक्सो) नुसार गुन्हा दाखल केला होता.

आत्तापर्यंत पाच अटकेत: याप्रकरणी शहर पोलिसांनी आतापर्यंत अत्याचार करणारे आरोपी आशिष नानासाहेब राऊत, किरण सोपान राऊत यांच्यासह नांदूर शिंगोटे येथील लॉज चालक ज्ञानेश्वर किसन क्षीरसागर, शिर्डी येथील लॉज चालक आकाश भास्कर बोंडारे यांना अटक केली असून हे सर्व आरोपी कोठडीत आहेत. याशिवाय मंगळवारी संगमनेरातील कॅफे क्रश बक्सचा मालक राहुल गौतम भालेराव, (राहणार भालेकर वस्ती मालदाड, संगमनेर) याला देखील अटक केली.

तिघे अद्यापही पसार: या गुन्ह्यातील तीन आरोपी फरार असून त्यातील दोघे कॅफे मालक आहेत. एका आरोपीचे नाव निष्पन्न झाले असले तरी त्याची अद्याप पूर्ण ओळख पटलेली नाही. उर्वरित आरोपींना तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव कधी अटक करतात याकडे लक्ष लागले आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,307
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये बुलेटच्या सायलेन्सरमधून मोठे आवाज काढणाऱ्या तरुणावर पोलिसांची कारवाई, दुचाकी जप्त

June 1, 2026

समनापूर प्राणघातक हल्ल्यातील मुख्य आरोपी जुनेद आणि अरबाज गजाआड; संगमनेर पोलिसांची पुण्यात धडाकेबाज कारवाई

June 1, 2026

संगमनेरच्या बजाज शोरूममध्ये नेमकं काय घडलं? ग्राहकाच्या तक्रारीनंतर खळबळ; मॅनेजरसह १० ते १५ जणांवर गुन्हा दाखल

May 31, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पत्रकारिता

“वाकचौरे आता थांबणार नाहीत…!” – एका विधानाने पेटलेली राजकीय चर्चा

By अनंत पांगारकरJune 4, 20260

संपादकीय अहिल्यानगरच्या राजकारणात सध्या शिवसेना, शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील घडामोडी वेगाने बदलत आहेत.…

रोटरी क्लबच्या जयपूर फूट वितरण उपक्रमातून दिव्यांगांना स्वावलंबनाची नवी दिशा; संगमनेरमध्ये ११४ दिव्यांगांना कृत्रिम अवयवांचे वाटप

June 4, 2026

आज गुरुवार, ४ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 4, 2026

संगमनेर पालिकेच्या कारवाई विरोधात शिंदे शिवसेना आक्रमक; भाजीची पाटीच मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात नेत नगरसेविका साक्षी सूर्यवंशींचे ‘गांधीगिरी’ आंदोलन

June 3, 2026

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.