Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग

09/09/2026

आज बुधवार, ०९ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » एसएमबीटी (SMBT) क्लिनिकचा सुपर स्पेशलिटी बाहयरुग्ण विभाग संगमनेरात पूर्णवेळ सुरू! आरोग्य सेवेचा एसएमबीटी ब्रँडनेम – माजी आमदार तांबे
आरोग्य

एसएमबीटी (SMBT) क्लिनिकचा सुपर स्पेशलिटी बाहयरुग्ण विभाग संगमनेरात पूर्णवेळ सुरू! आरोग्य सेवेचा एसएमबीटी ब्रँडनेम – माजी आमदार तांबे

अमृतवाहिनी हॉस्पिटलमध्ये अद्यावत व अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध... डॉ. जयश्री थोरात
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar02/03/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर दि. – २
एसएमबीटी ही संस्था आता देशातील आरोग्य सेवेचा ब्रँड नेम ठरली आहे. दररोज हजारो शस्त्रक्रिया एसएमबीटीमध्ये होत आहे. संगमनेर तालुक्यातील रुग्णांना सोयीस्कर व्हावे यासाठी अमृतवाहिनी रोलर हॉस्पिटलमध्ये एसएमबीटीची बाह्य रुग्णसेवा उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे प्रतिपादन नासिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले.
संगमनेरमधील गोरगरीब आणि सामान्य नागरिकांना आरोग्याच्या अत्याधुनिक व दर्जेदार सुविधा त्वरित व माफक दरात उपलब्ध व्हाव्या, या हेतूने काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी हॉस्पिटलमध्ये एसएमबीटी क्लिनिकचा पूर्णवेळ सुपर स्पेशालिटी बाह्य रुग्ण विभाग शनिवारी सुरू करण्यात आला. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे बोलत होते.
माजी आमदार तांबे यांच्यासह कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्री थोरात, माजी जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुऱ्हे, प्राचार्य डॉ. अशोक पाटील, डॉ. बाळकृष्ण देशपांडे, डॉ. सचिन गोडसे, डॉ. नितीन बस्ते, डॉ. राज मस्के, सुरज कडलग, डॉ. सुरज तुपसागरे, डॉ. सचिन बोरसे, महेश वाव्हळ, सिताराम दिघे, धनंजय भुसाळ आदींसह एसएमबीटीमधील विविध डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. तांबे म्हणाले, गोरगरीब आदिवासी व सर्वसामान्य माणसांच्या आरोग्य सेवेकरिता थोर स्वातंत्र्य सेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी एसएमबीटी सेवाभावी ट्रस्टच्या माध्यमातून अमृतवाहिनी रूलर हॉस्पिटल सुरू केले. अमृतवाहिनी हॉस्पिटलमधील एसएमबीटीच्या या बाह्य रुग्ण विभागांमध्ये एसएमबीटीमधील तज्ञ डॉक्टर दररोज भेट देणार असून ते रुग्णांची तपासणी करतील.
कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या, प्रत्येक माणूस आरोग्याकडे दुर्लक्ष करत असून त्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवतात. ग्रामीण भागातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्या याकरिता एसएमबीटीच्या माध्यमातून अत्यंत चांगले काम होत असून संगमनेर तालुक्यात नव्याने सुरू झालेल्या या बाह्यरुग्ण विभागामुळे गोरगरीब, शेतकरी, महिला यांची मोठी सोय होणार आहे. येथे काही ऑपरेशनसह विविध शस्त्रक्रिया तसेच तपासण्या केल्या जाणार असून मोठ्या शस्त्रक्रिया तातडीने एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये केल्या जाणार आहेत.
या बाह्यरुग्ण विभागामध्ये दररोज हृदयविकार शस्त्रक्रिया, कर्करोग, मूत्रविकार, मेंदू व मणके विकार, सांधेरोपण क्रिया, प्लास्टिक सर्जरी, जन्मजात आजार ,अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, डीआरटीडी, ईपी स्टडी आदींसह सोनोग्राफी, रक्त, लघवी, तपासणी अशा विविध तपासण्याही केल्या जाणार आहेत.

हृदयविकार तज्ञ डॉ. गौरव वर्मा दर मंगळवार व शुक्रवारी…
महिन्याचा पहिल्या व तिसऱ्या बुधवारी कर्करोग तपासणी केली जाणार आहे. तर दर मंगळवारी व शुक्रवारी प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. गौरव वर्मा हे हृदयरोग विकाराची तपासणी करणार आहेत. शुक्रवारी मेंदू व मनके विकाराशी संबंधित आजाराच्या तपासण्या होणार असून महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या शनिवारी मूत्ररोग विकार तपासणी होणार आहे. या क्षेत्रातील तज्ञ व नामवंत डॉक्टर तपासणीसाठी उपस्थित राहून उपचार करणार असल्याची माहिती देण्यात आली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,485
एस एम बी टी हॉस्पिटल एसएमबीटी हॉस्पिटल डॉक्टर जयश्री थोरात डॉक्टर सुधीर तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

19/07/2026

मध्यरात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल; आगामी दौरे आणि कार्यक्रम तूर्तास पुढे ढकलले

04/07/2026

केमिकलयुक्त दूषित पाण्यामुळे बदापूर येथील शेती धोक्यात; विहिरींचे पाणी दूषित, तलावातील मासे मृत

11/06/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आर्थिक

सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग

By Annant Ppangarkar09/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – सोशल मीडियावरील रिल्स, भ्रामक ट्रेंड आणि ऑनलाइन चर्चांच्या…

आज बुधवार, ०९ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

शिंदेवाडी जिल्हा परिषद शाळेत ‘एक विद्यार्थी, एक बेंच’ उपक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद; आठवडाभरात ६८ हजारांच्या लोकसहभागातून ४० बेंचचे लोकार्पण

08/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.