Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » डॅशिंग आयएएस तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली, आता असतील ‘या’ विभागाचे विकास आयुक्त
प्रशासन

डॅशिंग आयएएस तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली, आता असतील ‘या’ विभागाचे विकास आयुक्त

मुंडे आणि बदली समीकरण
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar18/06/2024Updated:18/06/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मंगळवार, १८ जून २०२४

आपल्या १९ वर्षाच्या प्रशासकीय कार्यकाळात वीसपेक्षा अधिक बदल्यांना सामोरे जाणाऱ्या व प्रशासनातील धडाकेबाज अधिकारी म्हणून ख्याती असलेल्या आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची राज्य शासनाने पुन्हा एकदा बदली केली आहे.

मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी मंगळवारी मुंढे यांच्या बदलीचे आदेश काढले आहे. या बदलीमुळे मुंढे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. मुंढे यांच्या रिक्त जागी राजेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे देखील या आदेशात म्हटले आहे.

मुंढे यांच्याकडे दुग्धविकास आणि पशुसंवर्धन या खात्याच्या सचिवपदाचा पदभार होता. या पदावरून त्यांची बदली आता कमी महत्त्वाच्या असलेल्या विकास आयुक्त (असंघटित कामगार) मुंबई या पदावर करण्यात आली आहे. प्रशासकीय सेवेत धडाकेबाज अधिकारी म्हणून ख्याती असलेल्या मुंढे यांना अनेकदा राज्यकर्त्यांच्या रोशाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे त्यांच्यावर सातत्याने बदलीची टांगती तलवार असते.

राजकीय नेत्यांसोबत सातत्याने खटके उडाल्याने वादग्रस्त अधिकारी म्हणूनही त्यांची राजकीय वर्तुळात ओळख आहे. मात्र, तुकाराम मुंढे आणि बदली हे नवं समीकरण राज्यात गेल्या काही वर्षात पाहायला मिळत आहे. पशुसंवर्धन आणि दुग्ध विकासाच्या सचिवपदी गतवर्षी बदली करण्यात आलेल्या तुकाराम मुंडेंची पुन्हा एकदा बदली झाल्याने आता ते नव्या विभागाचे विकास आयुक्त असतील.

तुकाराम मुंढे यांची आत्तापर्यंत कधी व कुठे झाली बदली…

ऑगस्ट २००५ – प्रशिक्षणार्थी, उपजिल्हाधिकारी सोलापूर

सप्टेंबर २००७ – उप जिल्हाधिकारी, देगलूर उपविभाग

जानेवारी २००८ – सीईओ, जिल्हा परिषद नागपूर

मार्च २००९ – आयुक्त, आदिवासी विभाग

जुलै २००९ – सीईओ, वाशिम

जून २०१० – सीईओ, कल्याण

जून २०११ – जिल्हाधिकारी, जालना

सप्टेंबर २०१२ – विक्रीकर सहआयुक्त मुंबई

नोव्हेंबर २०१४ – सोलापूर जिल्हाधिकारी

मे २०१६ – आयुक्त, नवी मुंबई महापालिका

मार्च २०१७ – मुख्य कार्यकारी अधिकारी, पीएमपीएल, पुणे

फेब्रुवारी २०१८ – आयुक्त, नाशिक महापालिका

नोव्हेंबर २०१८ – सहसचिव, नियोजन

डिसेंबर २०१८ -प्रकल्प अधिकारी, एड्स नियंत्रण, मुंबई

जानेवारी २०२० – आयुक्त, नागपूर महापालिका

ऑगस्ट २०२० – सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई

जानेवारी २०२१ – राष्ट्रीय मानवाधिकार आयोग भारत

सप्टेंबर २०२२ – आयुक्‍त आरोग्‍य सेवा व संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान 

जून २०२२ – मराठी भाषा विभाग

जुलै २०२३ – पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास विभाग

१८ जून २०२४ – विकास आयुक्त (असंघटित कामगार)

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/Vasant-launch-video.mp4
Advt
anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 2,699
तुकाराम मुंढे बदली
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026

५० लाखांची कथित खंडणी अन् प्रशासकीय अनागोंदी: मुख्याधिकारी सक्तीच्या रजेवर, जिल्हाधिकाऱ्यांची कठोर कारवाई; नायब तहसीलदार मोहसीन शेख यांच्याकडे अतिरिक्त पदभार

24/09/2026

अन्न व औषध प्रशासनाची संगमनेरमध्ये कारवाई: २.६० लाखांचे संशयास्पद ‘काऊ घी’ जप्त, तर भेसळप्रकरणी दुग्ध केंद्राचा परवाना निलंबित

22/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
Uncategorized

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- विजयादशमीच्या मंगलपर्वानिमित्त संगमनेरमधील अकोले रोडवरील मालपाणी इंडस्ट्रियल पार्कमध्ये मंगळवारी, (२० ऑक्टोंबर)…

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.