जाणून घ्या… आजचे राशीभविष्य
बुधवार दि. २८ ऑगस्ट २०२४
मेष – आज आपल्यावर आलेल्या संकटात भावाची मोलाची मदत मिळेल. आपल्या संततीमुळे आज आपला मान सन्मान वाढेल.
वृषभ – आपल्या राशीमध्ये असलेला राजयोग आज आपल्याला प्रकर्षाने जाणवेल. जोडीदाराकडून आर्थिक मदत मिळेल.
मिथुन – अतिशय खर्चिक दिवस. आज स्वभाव चिडचिडा बनेल. स्वभावावर नियंत्रण ठेवा.
कर्क – आज संततीसाठी किंवा संततीकडून अतिशय पैसा खर्च केला जाईल. आज आपलं भाग्य आपल्याला साथ देणार नाही.
सिंह – आज तब्येत साथ देणार नाही. साथीच्या आजारामुळे वैतागून जाल. आज आराम करा.
कन्या – लाभस्थानी असलेला राशी स्वामी बुध आज शेअर मार्केटमध्ये लाभ मिळवून देण्याची शक्यता.
तूळ – आज कंबर, पोटाच्या व्याधीमुळे त्रस्त असाल. पोटदुखीमुळे वैतागून जाल. तरीसुद्धा अंगात एक प्रकारचं चैतन्य संचारल्यासारखं वाटेल.
वृश्चिक – आज मित्र परिवाराकडून आर्थिक फायदा होण्याची शक्यता. जुनी येणी वसूल होईल.
धनु – वाहन चोरी होऊ शकते. पाकीट सांभाळा. आज कुलदैवतेची आराधना करा.
मकर – अतिशय आनंदी दिवस. डोळ्याचे विकार संभवतात. आज संततीमुळे आपला मान सन्मान वाढेल.
कुंभ – आज वडीलधाऱ्यांच्या बोलण्याला मान द्या, त्यांचा आदर करा.
मीन – कोणावरही विश्वास ठेवू नका. सावध राहा.
सिद्धस्वामी ज्योतिष (संपर्क- ९०२९९११४११)

