Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग

09/09/2026

आज बुधवार, ०९ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » १७ वर्षीय रुग्ण कर्करोगमुक्त, एसएमबीटी कॅन्सर इन्स्टीट्यूटमध्ये अत्याधुनिक कार-टी सेल थेरपी यशस्वी
आरोग्य

१७ वर्षीय रुग्ण कर्करोगमुक्त, एसएमबीटी कॅन्सर इन्स्टीट्यूटमध्ये अत्याधुनिक कार-टी सेल थेरपी यशस्वी

रक्तविकार कर्करोगतज्ञ डॉ. गिरीश बदरखे यांनी दिली माहिती
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar18/12/2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

बुधवार १८ प्रतिनिधी

नाशिक – परदेशात अत्यंत महागडी समजली जाणारी व कर्करोग उपचारावर महत्वाची असलेली ‘कार-टी सेल’ (CAR-T) थेरपी भारतीय संशोधनानंतर सवलतीत उपलब्ध झाली आहे. या सवलतीचा फायदा सर्वसामान्य रुग्णांना होण्यास सुरुवात झाली आहे. ही थेरपी नुकतीच एसएमबीटी हॉस्पिटलच्या कॅन्सर इन्स्टीट्युटमध्ये १७ वर्षीय रुग्णावर यशस्वी पार पडली. या रुग्णाचे सर्व रिपोर्ट नॉर्मल आले असून हा रुग्ण पूर्णपणे कर्करोगमुक्त झाला आहे. ही थेरपी ल्युकेमिया आणि लिम्फोमा यांसारख्या बी-सेल कर्करोगांवर (रोगप्रतिकारक प्रणालीच्यापेशींमध्ये तयार होणारा कर्करोगाचा प्रकार) उपचार करण्यासाठी महत्वाची असल्याचे एसएमबीटी हॉस्पिटलचे रक्तविकार कर्करोगतज्ञ डॉ. गिरीश बदरखे यांनी सांगितले.

कार-टीसेल थेरपी ही मुंबई आयआयटीचे शास्रज्ञ डॉ. राहुल पूरवार आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे कर्करोग विभागातील प्रोफेसर डॉ. हसमुख जैन यांच्या पुढाकाराने रक्ताच्या कर्करोगावर भारतीय संशोधन प्रणाली आहे. अलीकडेच इम्म्युनो ॲक्ट आणि एसएमबीटी हॉस्पिटल करारबद्ध झाले. यानंतर झालेल्या क्लिनिकल ट्रायलमध्ये दोन रुग्णांवर एसएमबीटीत यशस्वी उपचार करण्यात आले होते. यानंतर एसएमबीटीच्या विशेष केअर प्लस विभागात नागपूरच्या १७ वर्षीय यशवंतवर (नाव बदललेले) तिसरी कार-टी सेल थेरपी करण्यात आली. या रुग्णाचे रिपोर्ट पूर्णपणे नॉर्मल आले असल्यामुळे हा रुग्ण कर्करोगमुक्त झाल्याचे तज्ञांनी सांगितले. सवलतीच्यादरात होत असलेल्या उपचार पद्धतीचा लाभ आता सर्वसामान्य रुग्णांना मिळण्यास सुरुवात झाली आहे. कार-टी सेल थेरपी उत्तर महाराष्ट्रात एकमेव एसएमबीटी हॉस्पिटल येथे सुरु झाल्याने उत्तर महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यातील रुग्णांसाठी आशेचा किरण एसएमबीटी हॉस्पिटल बनले आहे.

उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठया चॅरीटेबल हॉस्पिटल असलेल्या एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये जगातील सर्वात अत्याधुनिक थेरपी करण्यात आल्याने सर्वत्र कौतुक केले जात आहे. कार-टीसेल थेरपीमध्ये शरीरातील पांढऱ्या पेशींना औषधोपचारांच्या माध्यमातून रोगप्रतिकारक शक्तींमध्ये बदलले जाते. त्यामुळे या पेशी शरीरातील कर्करोग पेशींचा नाश करण्यासाठी काम करू लागतात. टी पेशीरुग्णाच्या रक्तातून गोळा केल्या जातात आणि मानवनिर्मित रिसेप्टरसाठी जनुक जोडून प्रयोगशाळेत अनुवांशिकरीत्या सुधारित केले जातात, ज्याला काइमरिक प्रतिजन रिसेप्टर किंवा ‘सीएआर’ म्हणतात.हे विशिष्ट कर्करोग पेशी प्रतिजन ओळखण्यात मदत करते. त्यानंतर, सीएआर-टी पेशी रुग्णाला परत केल्या जातात. अशा माध्यमातून कार-टी सेल थेरपी कार्य करते. जगातील कॅन्सर उपचारावर होत असलेल्या कोट्यावधी रुपयांचा खर्च भारतीय संशोधनामुळे आता लाखांत आला आहे.

रुग्ण कर्करोगमुक्त…

हा रुग्ण एसएमबीटीत आला तेव्हा बोन मॅरो ट्रान्सप्लांट करावा लागेल असे प्राथमिक चित्र होते. मात्र, अत्याधुनिक तंत्रज्ञान याठिकाणी उपलब्ध असल्यामुळे आम्ही त्यांना कार-टी सेल थेरपी करण्याचा सल्ला दिला. या थेरपीबाबत सर्व प्रकारची माहिती दिल्यानंतर नातेवाईकांनी तात्काळ होकार दिला. यानंतर कार-टी सेल थेरपी यशस्वी करण्यात आली. रुग्णाने चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे रुग्णाची प्रकृती सुधारली आहे. त्याचे सर्व रिपोर्ट नॉर्मल आले असून तो कर्करोगमुक्त झाला असल्याचे सांगताना आनंद होत आहे. – डॉ. गिरीश बदरखे, रक्तविकार कर्करोगतज्ञ, एसएमबीटी कॅन्सर इन्स्टीट्युट.

कर्करोग मुक्तीसाठी एसएमबीटी उत्तम पर्याय… एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये अद्ययावत उपचारास प्रभावीपणे सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी विशेष केअर प्लस विभाग सुरु करण्यात आला असून याठिकाणी क्लिष्ट आणि अवघड शस्त्रक्रियांसाठी उत्तम प्रकारच्या मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या ठिकाणी बोन मॅरो ट्रान्सप्लांट, कार-टी सेल थेरपी, सर्व प्रकारच्या कर्करोगावर व लहान मुलांच्या कर्करोगावर उपचार केले जात आहेत. विशेष म्हणजे, सुसज्ज आयसोलेशन वार्ड या ठिकाणी साकारण्यात आल्याने कर्करोग उपचारासाठी एसएमबीटी उत्तम पर्याय रुग्णांना उपलब्ध झाला आहे. – डॉ. मीनल मोहगावकर, अधिष्ठाता, एसएमबीटी हॉस्पिटल.

नवी स्वप्न बघण्याची ताकद एसएमबीटीमुळे मिळाली… मी साधा शेतकरी माणूस आहे. माझ्या मुलाला जेव्हा कर्करोग असल्याचे आम्हाला समजले तेव्हा पायाखालची जमीन सरकली. पण, मुलाला कधी जाणवू दिले नाही की, त्याला हा आजार आहे. एक वेळ अशी होती की, मुलाकडे बघितले तरी डोळ्यात पाणी यायचे इतका तो अशक्त झाला होता. एसएमबीटीत दाखल झालो आणि येथील डॉक्टरांनी त्याच्यावर यशस्वी उपचार केले आज डिस्चार्ज आहे, मुलाची तब्बेत सुधारली आहे. नवी स्वप्न सोबत घेऊन आनंदाने घरी जात आहोत. – रुग्णाचे वडील.

कर्करोगावर हे उपचार उपलब्ध… एसएमबीटी कॅन्सर इन्सिट्यूटमध्ये टाटा स्मारक केंद्र यांच्या तांत्रिक मार्गदर्शनासह कॅन्सर रुग्णांवर उपचार केले जातात. बाह्यरुग्ण तपासणी, तज्ञ डॉक्टरांचा सल्ला व मार्गदर्शन मोफत उपलब्ध आहे. यात ऑन्कोसर्जरी, तोंडाची सर्जरी, ब्रेस्ट सर्जरी, पेडीयाट्रिक ऑन्कोलॉजी, तसेच मेडिकल ऑन्कोलॉजी, किमोथेरेपी, इम्युनोथेरेपी, हार्मोनिल थेरपी करण्यात येते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 772
एसएमबीटी हॉस्पिटल कर्करोग उपचार
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

19/07/2026

मध्यरात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल; आगामी दौरे आणि कार्यक्रम तूर्तास पुढे ढकलले

04/07/2026

केमिकलयुक्त दूषित पाण्यामुळे बदापूर येथील शेती धोक्यात; विहिरींचे पाणी दूषित, तलावातील मासे मृत

11/06/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आर्थिक

सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग

By Annant Ppangarkar09/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – सोशल मीडियावरील रिल्स, भ्रामक ट्रेंड आणि ऑनलाइन चर्चांच्या…

आज बुधवार, ०९ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

शिंदेवाडी जिल्हा परिषद शाळेत ‘एक विद्यार्थी, एक बेंच’ उपक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद; आठवडाभरात ६८ हजारांच्या लोकसहभागातून ४० बेंचचे लोकार्पण

08/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.