Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026

संगमनेरमध्ये लोड शेडिंगविरोधात काँग्रेस आक्रमक; सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची महावितरणकडे मागणी

05/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नासिक-पुणे महामार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात, नऊ जणांचा करुण अंत
अपघात

नासिक-पुणे महामार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात, नऊ जणांचा करुण अंत

या भयंकर अपघातात चार महिला, चार पुरुष आणि एका बाळाचा दुर्दैवी अंत झाला. तर अपघातात सात जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नारायणगाव येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/01/2025Updated:17/01/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज 

नाशिक-पुणे महामार्गावर शुक्रवारी (१७ जानेवारी) सकाळी झालेल्या तीन वाहनांच्या भीषण अपघातामध्ये नऊ जणांचा करुण अंत झाला आहे. तर सात जण गंभीर जखमी झाले असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नाशिकमधील दुर्दैवी घटनेत आत्तापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला. आता त्या पाठोपाठ नारायणगाव जवळ झालेल्या या अपघातामुळे महाराष्ट्र हळहळला आहे. एसटी बस, ट्रक आणि मॅक्झिमो व्हॅनमध्ये हा मोठा अपघात झाला.

देबुबाई दामू टाकळकर (वय ६५ वर्ष, रा. वैशखखेडे ता. जुन्नर जि. पुणे), विनोद केरूभाऊ रोकडे (वय ५० वर्ष, रा. कांदळी ता. जुन्नर जि. पुणे), युवराज महादेव वाव्हळ (वय २३ वर्ष, रा. १४ नंबर कांदळी ता. जुन्नर जि. पुणे), चंद्रकांत कारभारी गुंजाळ (वय ५७ वर्ष, रा. कांदळी ता. जुन्नर जि. पुणे), गीता बाबुराव गवारे (वय ४५ वर्षे, रा. कांदळी ता. जुन्नर जि. पुणे), भाऊ रभाजी बडे (वय ६५ वर्ष, रा. नगदवाडी कांदळी, ता. जुन्नर जि. पुणे), नजमा अहमद हनीफ शेख (वय ३५ वर्ष, रा. गडही मैदान खेड राजगुरुनगर), वशिफा वशिम इनामदार (वय ५ वर्ष), मनीषा नानासाहेब पाचरणे (वय ५६ वर्षे, रा. १४ नंबर ता. जुन्नर, जि. पुणे) अशी मृतांची नावे समोर आली आहे.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगावजवळ तीन वाहनांमध्ये भीषण अपघात झाला. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही भयंकर घटना घडली. सुरुवातीला प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅक्स ऑटो गाडीला पाठीमागून आयशर टेम्पोने जोराची धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की चेंडूप्रमाणे ही मॅक्स ऑटो फेकली गेली आणि पुढे एका ब्रेक फेल झालेल्या बसवर आदळली.

या भयंकर अपघातात चार महिला, चार पुरुष आणि एका बाळाचा दुर्दैवी अंत झाला. तर अपघातात सात जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नारायणगाव येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मृतांचा आकडा वाढण्याचीही भिती वर्तवली जात आहे.

https://x.com/Dev_Fadnavis/status/1880152051268665773?t=zvaASRiWMvEfFNZmwdPi8Q&s=19

सरकारकडून पाच लाखांची मदत… दरम्यान, या अपघातप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त करत मृतांच्या नातेवाईकांना शासकीय मदत जाहीर केली आहे. पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगावजवळ झालेल्या भीषण अपघातात ९ जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना करतो. मृतांच्या वारसांना ५ लाख रुपये आर्थिक सहाय्य मुख्यमंत्री सहायता निधीतून करण्यात येईल. जखमींच्या उपचाराची योग्य काळजी घ्या, असे पुणे पोलिस अधीक्षकांना सांगितल्याचे मुख्यमंत्री म्हणालेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 3,016
अपघात
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

दुःखावर दुःखाचा डोंगर! नातेवाईकाच्या दशक्रिया विधीसाठी आलेल्या महिलेचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू

21/08/2026

संगमनेरच्या डॉक्टरवर राहता पोलिसात गुन्हा दाखल! एकाचा मृत्यू, एक गंभीर

21/08/2026

पर्यटकांच्या भरधाव स्कॉर्पिओच्या धडकेत आरुषी कर्पे या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू

02/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

By Annant Ppangarkar05/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: संगमनेर शहराच्या सुरक्षिततेत आणि सौंदर्यीकरणात भर घालणाऱ्या विविध विकासकामांचे…

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026

संगमनेरमध्ये लोड शेडिंगविरोधात काँग्रेस आक्रमक; सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची महावितरणकडे मागणी

05/09/2026

संगमनेरात जयहिंद लोकचळवळीच्या वतीने उद्या आणि परवा बालकला महोत्सवाचे आयोजन; विविध उपक्रमांसह रंगभरण स्पर्धेची पर्वणी

05/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.