Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026

आज मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

01/09/2026

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

31/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सरकारची मोठी कारवाई, तत्कालीन तहसीलदारासह पाच जणांचे यासाठी केले निलंबन
प्रशासन

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सरकारची मोठी कारवाई, तत्कालीन तहसीलदारासह पाच जणांचे यासाठी केले निलंबन

निलंबन करण्यात आलेल्यांमध्ये तहसीलदार नितीन कुमार देवरे, नायब तहसीलदार संदीप धारणकर यांच्यासह मालेगाव तहसील कार्यालयातील लिपिक विजय अंभोरे, रेहान शेख तसेच अव्वल कारकून भरत शेवाळे यांचा समावेश आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar24/01/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

नाशिक – बांगलादेशी नागरिकांसह रोहिंग्यांना बनावट कागदपत्राच्या आधारे जन्म दाखल्यांचे वितरण केल्याचा खळबळजनक आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केल्यानंतर सरकारने यासाठी नेमलेल विशेष तपास पथक (एसआयटी) तीन दिवसापासून तळ ठोकून चौकशी करत असतानाच आता राज्य सरकारने मोठी कारवाई केली आहे. मालेगावचे तत्कालीन तहसीलदार व सध्या जळगाव जिल्ह्यात बोदवड येथे कार्यरत असलेले नितीनकुमार देवरे, मालेगावचे नायब तहसीलदार संदीप धारणकर यांच्यासह पाच जणांवर निलंबनाचा बडगा उगारला आहे.

निलंबन करण्यात आलेल्यांमध्ये तहसीलदार नितीन कुमार देवरे, नायब तहसीलदार संदीप धारणकर यांच्यासह मालेगाव तहसील कार्यालयातील लिपिक विजय अंभोरे, रेहान शेख तसेच अव्वल कारकून भरत शेवाळे यांचा समावेश आहे. तहसीलदार, नायब तहसीलदारांचे निलंबन राज्य सरकारने केले असून उर्वरित तिघा कर्मचाऱ्यांचे निलंबन जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज शुक्रवारी (२४ जानेवारी) नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान ते या संदर्भातील आढावा घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. तत्पूर्वीच राज्य सरकारने ही कारवाई केली आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आपल्या एक्स अकाउंट वरून माहिती देताना या कारवाईचे स्वागत केले.

३९७७ जन्म प्रमाणपत्र बनावट कागदपत्राच्या आधारे – मालेगाव शहर व तालुक्यात बांगलादेशी नागरिकासह रोहिंग्यांना बनावट कागदपत्राच्या आधारे जन्म प्रमाणपत्राचे वाटप केले जात असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. मालेगाव शहरातून ३९७७ जन्म प्रमाणपत्र हे बरोबर कागदपत्रांच्या आधारे दिले गेल्याचे त्यांच्या एक्स अकाउंट वर म्हटले आहे.

एसआयटी चौकशी – दोन दिवसांपूर्वी स्वभाव यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र देत चौकशी होईपर्यंत जन्म दाखले वितरित करण्याची प्रक्रिया थांबविण्याची मागणी केली होती. त्यानुसार राज्य सरकारने तातडीने आदेश काढून सदर प्रक्रिया थांबवली. गेल्या तीन दिवसापासून एसआयटीचे पथक मालेगावमध्ये तळ ठोकून या संदर्भात चौकशी करत आहे.

निलंबन काळात देवरे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात – सोमय्या यांनी मालेगावमध्ये येऊन कागदपत्रांचे तपासणी करताना छावणी पोलीस ठाण्यात तक्रार दिला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत यासाठी एसआयटीची स्थापना केली होती. एसआयटी पथकातील अधिकारी ज्यांना जन्म प्रमाणपत्र देण्यात आले त्यांच्या घरी जाऊन कागदपत्राची पडताळणी करत असतानाच महसूल विभागाने गुरुवारी (२३ जानेवारी) मालेगावचे तत्कालीन व सध्या बोदवड येथे कार्यरत असलेले तहसीलदार नितीनकुमार देवरे यांच्यासह सध्याचे नायब तहसीलदार संदीप धारणकर यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. या दोघांची विभागीय चौकशी लावण्यात आली आहे. निलंबन काळात देवरे यांचे मुख्यालय जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात तर धारणकर यांचे मुख्यालय नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात ठेवण्यात आले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,267
अमित शहा किरीट सोमय्या तहसीलदार निलंबन देवेंद्र फडणवीस मालेगाव
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

उसनवारीवरील कर्मचाऱ्यांना १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात पाठवा; मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मुख्य सचिवांचे कडक आदेश

25/08/2026

राज्यात खळबळ..! तहसीलदार निलंबित; ‘ते’ प्रकरण भोवलं

14/08/2026

स्वातंत्र्यदिनी भंडारदरा, कळसूबाई फिरण्याचा प्लॅन आहे? आधी पोलिसांचे ‘हे’ नवीन वाहतूक नियम नक्की वाचा!

12/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पाण्याचे राजकारण

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

By Annant Ppangarkar01/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील भोजापूर प्रकल्पाच्या पूरचारीचा समावेश दमणगंगा–वैतरणा-गोदावरी नदीजोड प्रकल्पात…

आज मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

01/09/2026

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

31/08/2026

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.