Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

04/09/2026

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन; १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

04/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » जोशी स्वीट होम पुन्हा चर्चेत… कारवाई टाळण्यासाठी सत्ताधारी पक्षाच्या युवा नेत्याची एन्ट्री…
आरोग्य

जोशी स्वीट होम पुन्हा चर्चेत… कारवाई टाळण्यासाठी सत्ताधारी पक्षाच्या युवा नेत्याची एन्ट्री…

अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून या संदर्भातील चौकशी सुरू असून दुकानाच्या मालकाकडून काही खुलासे देखील मागविण्यात आले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar16/02/2025Updated:18/02/2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, दि. १६ फेब्रुवारी – प्रतिनिधी
अन्न व औषध प्रशासनाच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या संगमनेर मधील जोशी स्वीट होम वरील कारवाई टाळण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षाच्या एका बड्या युवा नेत्यामार्फत प्रशासनातील अधिकाऱ्यांवर दबाव आणला जात असल्याचे बोलले जात आहे.कच्चा आणि शिळा मिठ्ठावडा ग्राहकाला देऊन त्याच्याशी वाद घातल्याचा प्रकरणाचा व्हिडिओ मध्यंतरी समाज माध्यमात व्हायरल झाला होता. त्यानंतर संगमनेर मधील जोशी स्वीट होम चर्चेत आले होते. जोशी स्वीट होम मधील मिठाईसह अन्नपदार्थाची तपासणी अन्न व औषध प्रशासनाचा अधिकाऱ्यांनी केली होती. तपासणी दरम्यान काही नमुनेही ताब्यात घेण्यात आले होते. या तपासणीत काही गंभीर बाबी आढळून आल्याचा अहवाल समोर आला आहे. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून या संदर्भातील चौकशी सुरू असून दुकानाच्या मालकाकडून काही खुलासे देखील मागविण्यात आले आहे.
त्यामुळे चौकशी आणि कारवाईच्या फेऱ्यातून वाचण्यासाठी संबंधितांनी जिल्ह्यातील एका बड्या युवा नेत्या मार्फत अधिकाऱ्यांवर दबाव आणल्याची व हा बडा सत्ताधारी पक्षाचा युवा नेता कोण याबाबतची चर्चा सुरू आहे. दरम्यान सुरुवातीचा एक अहवाल समोर आल्यानंतर आणखी काही पदार्थांचे नमुने घेतले जाण्याची शक्यता असून या सर्वांचे रिपोर्ट आल्यानंतर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया केली जाणार असल्याने ही सर्व कारवाई थांबवण्यासाठी या नेत्यामार्फत हस्तक्षेप करून या संबंधातील माहिती कोणाला मिळू नये याची दक्षता घेतली जात आहे.
विशेष म्हणजे जोशी स्वीट होमवर कारवाई सुरू झाल्या झाल्याच या बड्या युवा नेत्याने अधिकाऱ्यांवर दबाव आणून कुठलीही माहिती बाहेर देऊ नका असा आदेश दिला असल्याचे देखील बोलले जात आहे. त्यामुळे अन्नपदार्थांचे लॅब मधील रिपोर्ट काय आहेत? कारवाई कोणत्या पद्धतीने सुरू आहे याची माहिती देखील देण्यासाठी संबंधित अधिकारी घाबरत असल्याचे दिसून येते.
मात्र या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी यामध्ये काही सामाजिक संघटना देखील सहभागी झाल्या असून अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची भेट घेऊन अहवालातील सत्य त्यांच्यासमोर मांडण्यात येणार आहे. तसेच अन्न व औषध प्रशासन आयुक्तांसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर महत्त्वाच्या अधिकाऱ्यांकडे सुद्धा अहवालासह तक्रारी करणार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान जोशी स्वीट होम संदर्भात सादर करण्यात आलेल्या अहवालात नमूद करण्यात आलेल्या त्रुटी ह्या स्वीट होम चालकाला आणि दुकानाला अडचणीत आणण्यासारख्या आहेत असे संबंधित खात्याकडून सांगितले जात आहे. तसेच दबावावर मौन बाळगून प्रतिक्रिया दिली जात नसली तरी कारवाईची प्रक्रिया मात्र टप्प्याटप्प्याने सुरू आहे. त्यामुळे संबंधित विभाग दबाव पाळतो की झुगारतो हे भविष्यात दिसून येणार आहे.

अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी याकडे देखील द्यावे लक्ष… दरम्यान संगमनेरमधील बहुतांशी खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून खाद्यपदार्थ वृत्तपत्राच्या कागदामध्ये बांधून दिले जातात. वृत्तपत्र छापण्यासाठी वापरलेली शाही आरोग्यास हानिकारक असल्याने त्यातून नागरिकांच्या जीवितेला धोका होऊ शकतो, त्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी अशा प्रकारे वृत्तपत्राच्या कागदात बांधून दिले जाणारे पदार्थ देखील तपासण्याची आवश्यकता आहे. वृत्तपत्राच्या कागदामध्ये तेलकट तसेच खाद्यपदार्थ देऊ नये. यासाठी दुकानदारांवर कारवाईचा बडगा उगारावा, अशी देखील समाज माध्यमात चर्चा सुरू आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 16,881
अन्न व औषध प्रशासन विभाग कारवाई जोशी स्वीट होम
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

पत्रकारावर हल्ला करणाऱ्या कुख्यात गुन्हेगार टोळीचे तोफखाना पोलिसांनी मोडले कंबरडे; केली ही मोठी कारवाई

26/08/2026

घारगाव पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड: २ लाख ५ हजार रुपयांच्या मुद्देमालासह ५ आरोपी ताब्यात

22/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

By Annant Ppangarkar04/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: श्रीराम फायनान्सकडून घेतलेल्या कर्जाच्या हप्त्याचा चेक बाऊन्स झाल्याप्रकरणी समशेरपूर…

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन; १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

04/09/2026

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.