बुधवार, दि. १९ फेब्रुवारी
मळीचा टँकर मागे घेत असताना चाकाखाली सापडून मजुराचा मृत्यू झाल्याची घटना संगमनेर शहरानजीच्या रायतेवाडी शिवारात घडली.
रवींद्र आबासाहेब कालेकर (वय ३७ वर्ष, रा. रांजणगाव बुद्रुक, ता. राहाता, जि. अहिल्यानगर) असे दुर्दैवी मृत्यू झालेल्या मजुराचे नाव आहे. चार दिवसांपूर्वी शनिवारी दुपारी घडलेल्या या घटनेप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात मंगळवारी टँकर चालक सुभाष पांडुरंग बोर्डे (रा. रांजणगाव बुद्रुक, ता. राहाता) यांच्या विरोधात मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संगमनेर शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. तपासानंतर फिर्यादीने फिर्याद दिल्यावर टँकर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
सुभाष बोर्डे हे त्यांच्या ताब्यातील मळीचा टँकर (MH 43 E 8640) हा रायतेवाडी येथील शेतकरी दिलीप शिवदास शिंदे यांच्या शेतात मागे घेत असताना रवींद्र कालेकर हा मजूर टँकरच्या चाकाखाली सापडून गंभीर जखमी झाला. त्यामुळे उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
यासंदर्भात सुपरवायझर अक्षय मारुती फोपसे (रा. गोंडेगाव, ता. श्रीरामपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुभाष पांडुरंग बोर्डे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हवालदार वायकर करत आहे.

मळीचा टँकर मागे घेताना चाकाखाली सापडून मजुराचा मृत्यू
यासंदर्भात अक्षय मारुती फोपसे (रा. गोंडेगाव, ता. श्रीरामपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुभाष पांडुरंग बोर्डे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास संगमनेर शहर पोलीस करत आहे.

