Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये नासिक-पुणे महामार्गावर विचित्र अपघात, दुचाकी स्वाराचा मृत्यू तर दोन वाहनचालकांविरुद्ध गुन्हा
अपघात

संगमनेरमध्ये नासिक-पुणे महामार्गावर विचित्र अपघात, दुचाकी स्वाराचा मृत्यू तर दोन वाहनचालकांविरुद्ध गुन्हा

अपघातानंतर ट्रॅक्टर चालक पळून गेला. दरम्यान अपघाताची माहिती समजताच संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेतली
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar22/02/2025No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, दि. २२ फेब्रुवारी – 

दुचाकीस्वाराला भरधाव वेगाने जाणाऱ्या आयटेन कारने जोराची धडक दिल्याने शेजारून जाणाऱ्या उसाच्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून झालेल्या विचित्र अपघातामध्ये दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला.

नासिक पुणे बाह्यवळण मार्गावर कृष्णा लॉन्स जवळ शनिवारी दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. सुदाम देवराम वर्पे (वय ४८ रा. चिकणी ता. संगमनेर जि. अहिल्यानगर) असे अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. 

या संदर्भात माहिती अशी, सुदाम वर्पे हे त्यांच्या ताब्यातील दुचाकीवरून (MH 17 M 9879) पुण्याच्या दिशेने जात असताना कृष्णा लॉन्स जवळ त्यांच्या दुचाकी ला मागून येणाऱ्या आयटेन कार चालकाने जोराची धडक दिली. कारची जोरात धडक बसल्याने वर्पे दुचाकी वरून उडून जवळून जात असलेल्या उसाच्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडले. ट्रॅक्टरचे चाक डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

अपघातानंतर ट्रॅक्टर चालक पळून गेला. दरम्यान अपघाताची माहिती समजताच संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेतली.

दरम्यान अपघातात मृत्यू झालेल्या वर्पे यांचा मुलगा शुभम सुदाम वर्पे याने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आयटेन कार चालक मुकेश दिनकर बहिरट (रा. काँग्रेस भवनाच्या मागे, शिवाजीनगर, पुणे) व अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर १२७/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४(अ)(ब) नुसार गुन्हा दाखल केला असून शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रमेश पाटील पुढील तपास करत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 3,035
अपघात
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

दुःखावर दुःखाचा डोंगर! नातेवाईकाच्या दशक्रिया विधीसाठी आलेल्या महिलेचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू

21/08/2026

संगमनेरच्या डॉक्टरवर राहता पोलिसात गुन्हा दाखल! एकाचा मृत्यू, एक गंभीर

21/08/2026

पर्यटकांच्या भरधाव स्कॉर्पिओच्या धडकेत आरुषी कर्पे या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू

02/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

By Annant Ppangarkar30/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर : खरीप हंगामातील पिकांची वाढती गरज आणि पिण्याच्या…

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026

वाळू तस्करांवर कारवाई, ट्रॅक्टरसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक तर तिघे फरार

30/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.