Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » कत्तलखान्यांचे अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या पथकाला असे काही आढळले की थेट दाखल करावा लागला गुन्हा…
प्रशासन

कत्तलखान्यांचे अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या पथकाला असे काही आढळले की थेट दाखल करावा लागला गुन्हा…

रमाई गार्डन शेजारी असलेल्या गुलाम हुसेन कुरेशी यांचे अवैध अतिक्रमण काढत असताना पथकाला गोवंश जनावरांचे कुजलेले अवशेष आढळून आले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar23/02/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, दि. २३ फेब्रुवारी

नगरपालिका हद्दीतील अवैध बांधकामे व अवैध कत्तलखान्यांविरोधात हाती घेण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेमध्ये अतिक्रमण हटवितांना असे काही समोर आढळले की त्यामुळे पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

गुरुवारी (२० फेब्रुवारी) संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी त्याचा प्रशासक रामदास कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील काही कत्तलखान्यांचे अतिक्रमण निष्काशीत करण्याची कारवाई करण्यात आली. नगरपालिकेचे प्रशासन अधिकारी प्रल्हाद देवरे, उपनगर अभियंता महेश गोर्डे, अल्ताफ शेख, भीमाशंकर वर्पे, जयराम मंडलिक, पंकज मुंगसे यांच्यासह पालिकेच्या कर्मचाऱ्यांचे पथक व संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथक संयुक्तरित्या अवैध बांधकामे व बेकायदेशीर कत्तलखान्याचे बांधकामे पाडण्याचे काम करत होते.

जमजम कॉलनीमधील अवैध कत्तलखान्याचे अतिक्रमण काढून पथक मौलाना आझाद मंगल कार्यालयामागील रमाई गार्डन शेजारी असलेल्या गुलाम हुसेन कुरेशी यांचे अवैध अतिक्रमण काढत असताना पथकाला गोवंश जनावरांचे कुजलेले अवशेष आढळून आले. त्यामुळे पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनवणे यांच्या आदेशावरून तात्काळ या कुजलेल्या अवस्थेतील तब्बल चारशे किलो वजनाच्या या अवशेषाचा पंचनामा करण्यात आला. 

लॅब तपासणीसाठी या गोवंश अवशेषाचे काही नमुने ताब्यात घेत उर्वरित सर्व अवशेष जेसीबीच्या सहाय्याने खड्डा घेऊन जमिनीत नष्ट करण्यात आले. सदरचे शेड हे गुलाम हुसेन कुरेशी याच्या मालकीचे असल्याने त्याला तात्काळ नोटीस देत शेड काढून टाकण्यास सांगण्यात आले.

तसेच संगमनेर शहर पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई अतुल दिनकर उंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी गुलाम हुसेन कुरेशी याच्या विरोधात राज्यात गोवंश जनावरांच्या कत्तलीस मनाई असताना गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करून त्यांचे कुजलेले अवशेष पत्राच्या शेडमध्ये ठेवले असल्याने भारतीय न्याय संहिता कलम २७१, ३२५ सह महाराष्ट्र पशुसंवर्धन सुधारणा अधिनियम १९९५ चे कलम ५(क), ९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार असे करत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 3,665
अतिक्रमण कारवाई गोवंश कत्तल
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

उसनवारीवरील कर्मचाऱ्यांना १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात पाठवा; मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मुख्य सचिवांचे कडक आदेश

25/08/2026

राज्यात खळबळ..! तहसीलदार निलंबित; ‘ते’ प्रकरण भोवलं

14/08/2026

स्वातंत्र्यदिनी भंडारदरा, कळसूबाई फिरण्याचा प्लॅन आहे? आधी पोलिसांचे ‘हे’ नवीन वाहतूक नियम नक्की वाचा!

12/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar03/09/20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी नवीन…

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.