Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर चौकशी समितीचा ठपका, नियमांचे उल्लंघन
आरोग्य

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर चौकशी समितीचा ठपका, नियमांचे उल्लंघन

पुणे परिमंडळाचे उपसंचालक डॉ. राधाकृष्ण पवार, सहायक संचालक डॉ. प्रशांत वाडीकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यम्मल्ले, पुणे मनपाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीना बोराडे आणि आरोग्य सेवा पुणे मंडळाच्या स्त्रीरोग तज्ञ वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्पना कांबळे यांचा या समितीत समावेश होता.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar07/04/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

पुणे, दि. ७ एप्रिल – 

गर्भवती महिलेला वेळेवर उपचार न मिळाल्याने झालेल्या मृत्यूप्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर राज्य शासनाच्या चौकशी समितीने ठपका ठेवला आहे.

भाजपा आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे यांना प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल करण्यास नकार देण्यात आला होता, कारण प्रशासनाने अगोदर १० लाख रुपये भरण्याची मागणी केली होती. यानंतर दुसऱ्या रुग्णालयात दाखल झाल्यावर तनिषा यांनी दोन जुळ्या मुलींना जन्म दिला, परंतु दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर आरोग्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले होते. आता या पाच सदस्यीय चौकशी समितीच्या प्राथमिक अहवालात रुग्णालयाने ‘नर्सिंग होम अँक्ट’मधील नियमांचे उल्लंघन केल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. रुग्णाला दाखल न करता अनामत रक्कम मागणे हे कायद्यानुसार चुकीचे असल्याचे अहवालात म्हटले आहे.

पुणे परिमंडळाचे उपसंचालक डॉ. राधाकृष्ण पवार, सहायक संचालक डॉ. प्रशांत वाडीकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यम्मल्ले, पुणे मनपाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीना बोराडे आणि आरोग्य सेवा पुणे मंडळाच्या स्त्रीरोग तज्ञ वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्पना कांबळे यांचा या समितीत समावेश होता. समितीने सादर केलेल्या अहवालात रुग्णाला तत्काळ दाखल न करणे ही रुग्णालयाची मोठी चूक असल्याचे नमूद केले आहे.

‘नर्सिंग होम अँक्ट’नुसार रुग्णांकडून दाखल करतेवेळी कोणतीही अनामत रक्कम मागता येत नाही. त्यामुळे तनिषा भिसे यांच्या मृत्यूप्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय दोषी असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे. महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करणे आवश्यक होते, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

रुग्णालयाच्या समितीने दिली होती क्लीन चीट…

यापूर्वी, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या तज्ञ समितीने सादर केलेल्या तीन पानी अहवालात रुग्णालयाची कोणतीही चूक नसल्याचे म्हटले होते. या समितीत वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर, डॉ. अनुजा जोशी, डॉ. समीर जोग आणि प्रशासक सचिन व्यवहारे यांचा समावेश होता. मात्र, आता राज्यस्तरीय चौकशी समितीच्या अहवालामुळे रुग्णालयाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 624
अहवाल चौकशी समिती तनिषा भिसे दीनानाथ मंगेशकर रुग्णालय
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

19/07/2026

मध्यरात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल; आगामी दौरे आणि कार्यक्रम तूर्तास पुढे ढकलले

04/07/2026

केमिकलयुक्त दूषित पाण्यामुळे बदापूर येथील शेती धोक्यात; विहिरींचे पाणी दूषित, तलावातील मासे मृत

11/06/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सांत्वन

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

By Annant Ppangarkar02/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जवळेकडलग येथील अकरा वर्षीय बालक कृष्णा वसंत पवार याचा…

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.