Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » रुग्णालयाला १० लाखांचा दंड, धर्मादाय रुग्णालयात अनामत रक्कम घेण्यास बंदी
आरोग्य

रुग्णालयाला १० लाखांचा दंड, धर्मादाय रुग्णालयात अनामत रक्कम घेण्यास बंदी

भिसे प्रकरणानंतर धर्मादाय रुग्णालयांसाठीच्या नियमावलीत मोठे बदल प्रस्तावित करण्यात आले असून, याबाबतचे आदेश लवकरच जारी केले जातील.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar22/04/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज – मुंबई

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे झालेल्या तनिषा भिसे यांच्या मृत्यूप्रकरणी राज्य सरकारने कठोर पाऊल उचलले आहे. या प्रकरणी डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश पोलीस आयुक्तांना देण्यात आले आहेत, तर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला १० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यासोबतच, धर्मादाय रुग्णालयांमध्ये रुग्णांकडून अनामत रक्कम घेण्यास मनाई करणारी कायदेशीर तरतूद करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने तयार केला आहे.

उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भिसे प्रकरणानंतर धर्मादाय रुग्णालयांसाठीच्या नियमावलीत मोठे बदल प्रस्तावित करण्यात आले असून, याबाबतचे आदेश लवकरच जारी केले जातील. नवीन नियमांनुसार, धर्मादाय म्हणून नोंदणीकृत असलेल्या सर्व रुग्णालयांमधील रुग्णसेवा पूर्णपणे ऑनलाईन करावी लागेल. त्याचे केंद्रीय स्तरावर व्यवस्थापन मुख्यमंत्री धर्मादाय कक्षाच्या माध्यमातून केले जाईल. या रुग्णालयांना रुग्णांकडून कोणत्याही प्रकारची अनामत रक्कम घेता येणार नाही. तसेच, रुग्णालयांनी त्यांच्या एकूण निधीपैकी १० टक्के रक्कम गरीब रुग्णांसाठी वापरली आहे किंवा नाही, याचा नियमित हिशेब धर्मादाय आयुक्तांकडे सादर करणे बंधनकारक असेल.

वैद्यकीय शिक्षण विभागाने दीनानाथ रुग्णालयाची चौकशी केल्यानंतर डॉ. घैसास आणि संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले. राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेच्या (इंडियन मेडिकल कौन्सिल) नियमांचे उल्लंघन केल्यामुळे डॉ. घैसास आणि इतर कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे. दीनानाथ रुग्णालयाला लावण्यात आलेल्या १० लाख रुपयांच्या दंडाच्या रकमेतून तनिषा भिसे यांच्या दोन मुलींच्या नावे प्रत्येकी पाच लाख रुपयांच्या मुदत ठेवी केल्या जातील आणि त्या मुली सज्ञान झाल्यावर त्यांना ही रक्कम मिळेल.

भिसे कुटुंबीयांची महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत सुनावणी:

तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी सोमवारी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या (एमएमसी) कार्यालयात सुनावणी झाली. या वेळी भिसे कुटुंबीयांनी आपली बाजू मांडली. पुणे पोलिसांनी डॉ. सुश्रुत घैसास यांना हजर राहण्याचे आदेश दिले असले तरी, ते गैरहजर राहिल्याने त्यांना पुढील सुनावणीसाठी बोलावण्यात येणार आहे. सुनावणीदरम्यान, मृत महिलेच्या कुटुंबीयांनी घडलेली संपूर्ण घटना चौकशी समितीसमोर कथन केली. त्यानुसार, गर्भवती महिलेवर रुग्णालयात करण्यात आलेल्या उपचारांसंबंधीचा अहवाल रुग्णालयाकडून मागविण्यात येणार आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 843
अनामत दंड दीनानाथ मंगेशकर रुग्णालय धर्मदाय रुग्णालय निर्णय
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

19/07/2026

मध्यरात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल; आगामी दौरे आणि कार्यक्रम तूर्तास पुढे ढकलले

04/07/2026

केमिकलयुक्त दूषित पाण्यामुळे बदापूर येथील शेती धोक्यात; विहिरींचे पाणी दूषित, तलावातील मासे मृत

11/06/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

By Annant Ppangarkar03/09/20260

Annant Ppangarkar मुंबई: माहिती अधिकाराचे प्रणेते आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे…

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.